Tripti Dimri | बॉलीवुड अभिनेत्री तृप्ती डीमरी ‘अॅनिमल ‘ या चित्रपटात झळकली होती. रणबीर कपूर सोबतची तृप्तीची केमिस्ट्री खूपच गाजली होती. या चित्रपटानंतर तृप्तीच्या चाहत्यांची संख्या झपाट्याने वाढली होती. आता तिने मुंबईत आलिशान घर घेतलं आहे. या घराची किंमत ही कोटींच्या घरात आहे.
तृप्ती डिमरी हिने मुंबईच्या आलिशान भागामध्ये घर खरेदी केले आहे. सध्या तृप्ती डिमरी हिच्याकडे अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर आहेत. काही मीडिया रिपोर्टनुसार, मुंबईच्या बांद्रा वेस्ट भागात कार्टर रोड येथे तृप्ती डिमरीने आलिशान बंगला घरेदी केला आहे.
तृप्ती डीमरीने खरेदी केला आलिशान बंगला
तृप्ती डिमरीच्या घराची किंमत ही तब्बल 14 कोटी आहे. तिने 3 जून रोजीच नव्या घराची सर्व प्रोसेस केली आहे. 70 लाख रूपये स्टाम्प ड्यूटी देखील तिने भरली आहे. या भागात अनेक मोठ्या कलाकारांची घरे आहेत. आता यात तृप्तीचा (Tripti Dimri) देखील नंबर लागला आहे.
तृप्तीने ज्या भागात घर घेतलंय, तिथेच रणबीर कपूर, आलिया भट्ट, रेखा यांची घरे आहेत. या भागात आता तृप्ती राहायला जाणार आहे. तृप्ती संपत्तीच्या बाबतीतही बरीच पुढे आहे. तिचं नाव आता आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत घेतलं जातं. अॅनिमल चित्रपटानंतर तृप्तीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं.
‘या’ चित्रपटात दिसणार तृप्ती
तृप्ती अलीकडेच IMDb च्या सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या भारतीय स्टार्सच्या टॉप 100 यादीत सामील झाली.तृप्ती डिमरी सध्या तिच्या कथित बॉयफ्रेंड सॅम मर्चंटसोबत सुट्टीचा आनंद घेत आहे.
तृप्तीने (Tripti Dimri) दोन दिवसांपूर्वीच तिच्या इन्स्टा स्टोरीवर सॅमसोबतची स्टोरी पोस्ट केली होती, ज्यामध्ये मावळत्या सूर्याचे सुंदर दृश्य पाहायला मिळाले होते. तृप्तीच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास ती लवकरच सिद्धांत चतुर्वेदीसोबत ‘धड़क 2’ मध्ये दिसून येणार आहे.
News Title- Tripti Dimri Bought Bungalow In Mumbai
महत्वाच्या बातम्या-
“वसंत दादांचा नातू निवडून आलाय, त्यामुळे ठाकरेंची..”; विशाल पाटलांचं वक्तव्य चर्चेत
सरकार स्थापनेपूर्वीच सराफा बाजारात तेजी; सोनं महागलं, आता किंमती काय?
“सुजल्यावरच कळतंय..”; शरद पवार गटाने बॅनरद्वारे अजित पवारांना डिवचलं
सरकारी बँकेने ग्राहकांना दिला झटका! व्याज दरात केली ‘तब्ब्ल’ एवढ्या टक्क्यांची वाढ
ठाकरे गटात पुन्हा राजकीय भूकंप?, शिंदे गटाच्या दाव्याने खळबळ