खासगी आयुष्याबदल तृप्ती डिमरीचा सर्वात मोठा खुलासा, म्हणाली ‘कोणत्या धंद्यात…’

Tripti Dimri | सोशल मीडियावर अभिनेत्री तुप्ती डिमरी (Tripti Dimri) आपल्या चाहत्यांसाठी कायम सक्रिय असते. चाहत्यांसाठी ती रोज नवनवीन फोटो शेअर करत असते. रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा ॲनिमल या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र या चित्रपटात रणबीर आणि रश्मिका या दोघांपेक्षा जास्त चर्चा झाली ती अभिनेत्री तृप्ती डिमरीची. दरम्यान सध्या चर्चा आहे ती तृप्तीने केलेल्या खुलाशाची.

काय म्हणाली तृप्ती?

एका मुलाखतीमध्ये बोलत असताना तृप्तीने (Tripti Dimri) आपल्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. बोलत असताना तृप्ती म्हणाली की, माझा जन्म दिल्लीत झाला असला तरी मी उत्तराखंड येथील आहे. दिल्लीत माझं शिक्षण झालं. माझं कुटुंब आणि आई – वडील दिल्लीत आहेत. मी जेव्हा मुंबईत आली तेव्हा हा प्रवास माझ्यासाठी सोपा नव्हता. प्रत्येक दिवशी 50 – 60 लोकांच्या समोर बाहेर जावं लागत होतं. समाज आणि कुटुंबातील लोकांनी माझ्या आई- वडिलांवर टीका केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Triptii Dimri (@tripti_dimri)

“कोणत्या धंद्यात मुलीला ढकललं”

या वेळी बोलत असताना तृप्ती म्हणाली की, ‘लोक म्हणायची कोणत्या धंद्यात मुलीला ढकललं आहे. तिचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. वाईट लोकांच्या सोबत राहिल्यामुळे तिचे निर्णय चुकतील. तिच्यासोबत कोणीच लग्न करणार नाही.’ मात्र, सतत बोलल्या जाणाऱ्या या गोष्टींमुळे माझ्या अपेक्षा संपल्या होत्या. विचार करा तुम्ही झोपेतून उठला आहात आणि तुमच्याकडे काम करायला काहीही नाही. पण मला माझ्या विश्वास होता, की मी काही तरी करुन दाखवेल. पुन्हा घरी जाऊन आई – वडिलांना म्हणणार नाही की, मला काहीही करता आलं नाही,’ असं देखील तृप्ती म्हणाली.

News Title : tripti dimri reveals about her life

महत्त्वाच्या बातम्या-

खुशखबर! जिओकडून ग्राहकांना मिळणार सर्वात मोठं गिफ्ट

बापरे! तिरुपती प्रसादाच्या लाडूत चक्क ‘या’ प्राण्यांची चरबी; देवस्थान समितीचे सदस्य म्हणाले…

सतर्क! ‘या’ जिल्ह्यांत वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता

घटस्फोटाच्या चर्चा दरम्यान, अभिषेक बच्चनने उचललं मोठं पाऊल!

महायुती आणि मविआला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्रात तिसरी आघाडी तयार; ‘या’ पक्षांचा समावेश