विद्या बालन पाठोपाठ ‘या’ अभिनेत्रीची झाली ‘भूल भूलैया 3’ मध्ये एंट्री

Bhool Bhulaiyaa 3 | अभिनेता अक्षय कुमार आणि विद्या बालन यांचा ‘भूल भुलैया’ (Bhool Bhulaiyaa 3) हा चित्रपट चांगलाच गाजला होता. यातील विद्याने केलेली मंजुलिकाची भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. याचा दूसरा भागही काढण्यात आला होता. यात विद्या आणि अक्षय ऐवजी दुसऱ्याच कलाकारांची वर्णी लागली होती.

अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या भूमिका असलेला Bhool Bhulaiyaa 2 मध्ये ‘मंजुलिका’ ची भूमिकाच नव्हती. त्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला होता. 2022 मध्ये आलेला हा चित्रपट पहिल्या पार्टसारखा चालला नाही. आता लवकरच याचा तिसरा पार्टही येणार आहे. यामध्ये कियाराऐवजी आता ‘अॅनिमल’ फेम तृप्ती डीमरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता कार्तिक आर्यनने याबाबत पोस्ट करत माहिती दिली आहे.

तृप्ती डीमरी ‘भूल भुलैया 3’ मध्ये दिसणार

एका हटके पद्धतीने कार्तिक आर्यनने तृप्ती या चित्रपटात दिसणार असल्याची घोषणा केली आहे. वेगवेगळे तुकडे असलेले पझल एकत्र जोडून नंतर एक वेगळी स्वतंत्र पोस्ट करत तृप्तीदेखील या चित्रपटात (Bhool Bhulaiyaa 3) झळकणार असल्याचं कार्तिकने सांगितलं आहे.

अभिनेत्री तृप्ती डीमरी रणबीर कपूर सोबत ‘अॅनिमल’ या चित्रपटात दिसली होती. यातील तिच्या भूमिकेने प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. यानंतर तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा झाला. आता ती कार्तिक आर्यनसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. या बातमीने तृप्ती डीमरीच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला आहे.

विद्या बालनची ‘भूल भुलैया 3’ मध्ये एंट्री

दरम्यान, या चित्रपटात अजून एक खास गोष्ट म्हणजे यामध्ये अभिनेत्री विद्या बालन देखील पुन्हा एंट्री करणार आहे. या चित्रपटातून ओरिजनल मंजुलिकाचं पुनरागमन होणार आहे. अर्थात विद्या बालन चित्रपटात पुन्हा दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

12 फेब्रुवारी रोजी कार्तिक आर्यनने एक व्हिडीओ शेअर करत विद्या बालन परत येत असल्याची माहिती दिली होती. या बातमीमुळे चाहत्यांचा आनंद गगनात मावेना झाला आहे. 2007 मध्ये आलेला भूल भुलैया (Bhool Bhulaiyaa 3) या चित्रपटात विद्याने साकारलेली मंजुलिकाची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. ती पुन्हा एकदा दिसणार म्हटल्यावर चाहते आनंदी झाले आहेत.

‘या’ दिवशी रिलीज होणार ‘Bhool Bhulaiyaa 3’

चाहते ‘भूल भुलैया 3’ या (Bhool Bhulaiyaa 3) चित्रपटाची आणि अर्थात विद्या बालनचीही आतुरतेने वाट पहात आहेत. हा चित्रपट दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच्या दुसऱ्या पार्टने जगभरातून 266 कोटी रुपये कमावले होते. आता तिसऱ्या पार्टची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

News Title – Triptii Dimri replaces Kiara Advani in Bhool Bhulaiyaa 3

महत्त्वाच्या बातम्या –

बॉलिवूडमधील आणखी एका कपलमध्ये मतभेद?, घटस्फोट घेणार?

अजय महाराज बारस्कर यांच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर!

अजिंक्य रहाणेच्या घरी आली आलिशान कार; किंमत जाणून बसेल धक्का

लोकसभा निवडणूक: निवडणूक आयोगाने शुभमन गिलवर सोपवली मोठी जबाबदारी!

मंदिरावरही लागणार ‘कर’, ‘हिंदूविरोधी’ म्हणत काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली!