भाजप सरकार त्रिपुरामध्ये गोमांस बंदी करणार नाही!

नवी दिल्ली | भाजप सरकार त्रिपुरामध्ये गोमांस बंदी करणार नाही, असं भाजपचे प्रभारी सुनील देवधर यांनी सांगितलं. राजधानी नवी दिल्लीत ते माध्यमांशी बोलत होते. 

नुकत्याच झालेल्या त्रिपुराच्या निवडणुकांमध्ये सुनील देवधर यांनी सत्तापालट करण्याचं महत्वाचं काम केलंय. त्यामुळे पत्रकारांनी गोमांस बंदीसंदर्भात त्यांना प्रश्न विचारला होता. 

राज्यातील बहुसंख्य जनतेला वाटत असेल गोमांस बंदी नको तर सरकार बंदी करणार नाही तसंच राज्यामध्ये बहुतांश मुसलमान आणि ख्रिश्चन आहेत. काही हिंदूही इथं मांस खातात, त्यामुळे राज्यात गोमांंस बंदी करावी, असं मला वाटत नाही, असं ते म्हणाले.