त्रिपुरात भाजप कार्यकर्त्यांचा उन्माद, हिंसाचाराच्या घटनांसह पुतळा पाडला

आगरताळा | त्रिपुरामध्ये विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांचा उन्माद पहायला मिळत आहेत. राज्यात हिंसाचाराच्या घटना ताज्या असताना आता एक पुतळा पाडल्याची घटना समोर आली आहे. 

दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यातील बेलोनियामध्ये रशियन राज्यक्रांतीचा प्रणेता लेनिनचा पुतळा होता. हा पुतळा भाजपच्या कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या मदतीने पाडला. 

पुतळा पाडताना ‘भारत माता की जय’च्या घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार जेसीबी चालकाला दारु पाजण्यात आली होती. पोलिसांनी त्याला अटक केलीय.