बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

थायरॉइडमुळे त्रस्त आहात?; आहारात करा ‘या’ 6 गोष्टींचा समावेश

मुंबई | घशाच्या खालच्या भागातील इंडोक्राइन ग्रंथील असलेल्या थायरॉइडचा अनेकांना त्रास असतो. हा आजार थायरॉइडच्या ग्रंथी वाढल्यामुळे होतो. याची लक्षणे लवकर दिसून येत नाहीत. जर तुमचं वजन अचानक जास्त वाढत असेल तर तुम्हाला थायरॉइडचा त्रास असण्याची शक्यता आहे. या आजाराचे प्रमाण महिलांमध्ये जास्त आढळते. कालांतराने हा आजार जीवघेणा ठरू शकतो, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

अचानक वजन वाढणे, चिडचिड होणे, हात थरथरणे, केस गळणे, हृद्याची धडधड वाढणे, झोप न लागणे, मासिक पाळी नियमित न येणे, मांसपेशीत कमजोरी आणि वेदना जाणवणे, ही लक्षणे दिसल्यास थायरॉइडचे संकेत समजावेत आणि त्वरित डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.

आपण आपल्या आहारात या सहा सुपरफुडचा समावेश करून थायरॉइडचा त्रास कमी करू शकता. अंडी, नट्स, कडधान्य, दही, लोणी आणि चिया बियाणे यांमुळे पदार्थांचा दररोजच्या अन्नात समावेश केला तर थायरॉइडचा त्रास कमी होण्यास मदत होते.

दरम्यान, हा एक सायलंट किलर आजार असल्याने याची लक्षणे लवकर जाणवत नाहीत, त्यामुळे लक्षणे दिसताच वेळीच डाॅक्टरांकडे जाणं आवश्यक आहे.

थोडक्यात बातम्या-

‘हिंमत असेल तर औरंगाबादचं नाव बदलून दाखवाच’; इम्तियाज जलील यांचं थेट आव्हान

ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी! दक्षिण आफ्रिकेचा 5 गडी राखून पराभव

‘सितारों से आगे जहाँ और भी हैं’; नवाब मलिकांचा शायरीतूून टोला

घटस्फोटानंतर समंथाने केलं तिचं स्वप्न पुर्ण, फोटो शेअर करत म्हणाली…

“आम्ही हिंदुत्वाचे पुराणपुरूष, बाबरी तोडली तेव्हा काखा वर करून पळालो नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More