बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ ठिकाणी ट्रक चालकांना मिळतो तब्बल 70 लाख पगार!

लंडन | आपल्या देशात इंजिनिअर आणि अन्य पदवीधारकांना काही हजारात पगार मिळतो. पण, ब्रिटन या देशात त्यापेक्षा जास्त पगार तर ट्रक चालकाला मिळतो. ब्रिटन या देशात मोठ्या दुकानांमध्ये माल वाहतुक करणाऱ्या ट्रक चालकाला वर्षाकाठी तब्बल 70000 पाउंड इतका पगार मिळतो. हा पगार भारतीय रूपयांमध्ये जवळपास 70 लाखांच्या घरात आहे. तसेच वर्षाला 2 लाख बोनसही मिळतो.

ब्रिटनमधील एका अहवालानुसार 1 लाख चालकांची गरज आहे. ब्रिटनच्या टेस्को आणि सेन्सबरी या कंपन्यामध्ये ट्रक चालकाला भरघोस पगार मिळतो. सुपरमार्केटमध्ये माल वेळेवर पोहचण्याचा त्यांना इतका गलेलठ्ठ पगार मिळतो.

चालकांची कमतरता पूर्ण भरून नाही काढली तर माल वेळेवर पोहोचणार नाही. त्यामुळं मालाच्या किंमतीत वाढ होऊ शकते. याचा थेट परिणाम नागरिकांवर होण्याची शक्यता असते. या देशात ट्रक चालक म्हणून काम करण्यास काही लोकांनी दोन वर्षाच्या करारावर काम करण्यासाठी संपर्क केला होता.

दरम्यान, या करारानुसार ट्रक चालकांना आठवड्यातून पाच दिवस काम करावं लागतं. शनिवार आणि रविवार कामाला सुट्टी असते. जर शनिवार आणि रविवार काम केलं तर दुप्पट पगार आणि बोनससुद्धा मिळतो.

थोडक्यात बातम्या –

मी उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, मी माझी भूमिका मांडली आता… – रामदास आठवले

पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचं विसर्जन होणार ‘या’ वेळेत, मंडळांनी दिली माहिती!

‘पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षात आणण्याची योग्य वेळ नाही’; अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितलं कारण

पोरांनो तयारीला लागा! पोलीस भरतीची तारीख जाहीर, वाचा संपूर्ण माहिती

ज्यावेळेस ‘ते’ येतील त्यावेळी ते भावी सहकारी – बाळासाहेब थोरात

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More