देश

…हीच भगवान रामाची खरी पूजा ठरेल- अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली | अयोध्येमधील रामजन्मभूमीमध्ये राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आता मंदिराच्या बांधकामाची पायाभरणीची तारीखही निश्चित झाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

कोरोनामुळे देशाची स्थिती अत्यंत वाईट होऊ शकते. प्रभु रामचंद्राचा आशीर्वाद आमच्यासोबत असल्याचे मी मानतो. त्यामुळेच आम्ही सर्व मिळून कोरोनासोबत लढत आहोत. आमच्या डॉक्टरांकडे रुग्णांचा प्राण वाचविण्यासाठी अत्यावश्यक सर्व सुविधा देण्याची ही वेळ आहे, असं केजरीवाल म्हणले.

देशातल्या गरीबांचा जीव वाचवणं, जो घाबरलेला आहे त्यांच्या मनातील भीती घालवणं, त्यांना मदत करणं, शिक्षण देणं, आरोग्य सेवा पुरवणं हीच भगवान रामाची खरी पूजा ठरू शकते, असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना केजरीवाल यांनी चीनसोबत निर्माण झालेल्या तणावावरही भाष्य केलं. भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारणे हे हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा मैत्री समसमान असेल. आम्ही अनेकदा अनुभवले, मग 1962 असो की 2020. भारताने मैत्रीचा हात पुढे केला. मात्र त्यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला, असं केजरीवालांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

नागपुरात हृदयद्रावक घटना; कोरोनाग्रस्त मातेचा मृत्यू, बाळ मात्र सुरक्षित

सलमान आणि संजय दत्तचे वकील लढणार रियाची केस; एका दिवसाची फी ऐकून धक्का बसेल..

“महाराष्ट्रात खंजीर खुपसण्यासाठी कोण ओळखले जातात याचा आधी शोध घ्या”

कोरोनावर मात केलेल्या रुग्णांना होतोय ‘हा’ आजार; वेळीच व्हा सावध

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर माजी केंद्रिय मंत्री जयराम नरेश यांचा सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या