पुणे | अनेक पोलिस आपल्या कुटुंबातील दुःख बाजूला ठेवून आपलं कर्तव्य बजावत आहेत. असंच एक उदाहरण पिंपरी-चिंचवडमध्ये पाहायला मिळत आहे. संबंधित पोलिस कर्मचार्याचा मुलगा गेल्या 9 महिन्यांपासून व्हेंटिलेटरवर आहे. असं असलं तरी हा कर्मचारी आपलं कर्तव्य पूर्ण करुन मुलाचा जीव वाचवण्यासाठी संघर्ष करत आहे.
दत्तात्रय कांबळे असं या पोलिस कर्मचाऱ्याचं नाव आहे. दत्तात्रय कांबळे हे सध्या पिंपरी-चिंचवड पोलिस स्टेशन या ठिकाणी कार्यरत आहेत. मात्र त्यांना सध्या दुहेरी कर्तव्य बजावावं लागत आहे.
एकीकडे आपल्या देशाप्रति असलेलं कर्तव्य बजावत असतानाच ते एक बाप म्हणून मुलाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांचा 27 वर्षीय मुलगा अक्षय कांबळे हा मृत्यूशी झुंज देत आहे.
दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असताना देखील ते आपले दोन्ही कर्तव्यं बजावताना दिसत आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
‘हातात पैसे नसताना गरीब कसे जगू शकतात?’; चिदंबरम यांचा मोदी सरकारला सवाल
लॉकडाऊनमध्ये अवैध गुटखा पकडला; पाठलाग करुन पकडलेला आरोपीच निघाला हवालदार!
महत्वाच्या बातम्या-
“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती यंदा डिजिटल माध्यमातून साजरी करा”
MPSC-UPSC विद्यार्थ्यांना दिलासा; यंदा वयोमर्यादा ओलांडणाऱ्यांना आणखी 1 वर्ष संधी मिळणार?
‘या’ दोन राज्यात सोमवारपासून मद्य विक्री सुरू होणार!
Comments are closed.