डोनाल्ड ट्रम्प यांचे धक्क्यावर धक्के; घेतला आणखी एक महत्त्वाचा निर्णय

Donald Trump

Donald Trump l अमेरिकेची आंतरराष्ट्रीय विकास संस्था, यूएसएआयडी (USAID) ने बांगलादेशातील (Bangladesh) सर्व मदत आणि प्रकल्प थांबवण्याचे (Aid and Projects Stopped) आदेश दिले आहेत. बांगलादेशच्या युनूस सरकारसाठी (Yunus Sarkar) हा निर्णय मोठा धक्का मानला जात आहे.

ट्रम्प सत्तेत आल्यानंतर उचललेले हे पहिले मोठे पाऊल आहे, ज्यामुळे बांगलादेशला विकास कामांसाठी मिळणारी मदत थांबणार आहे.

सबसिडी आणि करार तात्काळ बंद :

यूएसएआयडीने आपल्या निर्णयात सर्व प्रकारच्या कामाच्या ऑर्डर, करार आणि खरेदी प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिले आहेत. यूएसएआयडी बांगलादेशला आरोग्य (Health), शिक्षण (Education), शेती (Agriculture) आणि आर्थिक सुधारणा (Economic Reforms) यांसारख्या क्षेत्रात व्यापक मदत करत होती. या निर्णयामुळे तिथे सुरू असलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये व्यत्यय येऊ शकतो.

Donald Trump l गरीब देशांना आरोग्य मदतही बंद :

याबाबत यूएसएआयकडून एक पत्रही जारी करण्यात आले आहे. या पत्रात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या अलीकडील कार्यकारी आदेशाचा (Executive Order) हवाला देत म्हटले आहे की, “सर्व यूएसएआयडी भागीदारांना (USAID Partners) यूएसएआयडी आणि बांगलादेश करारांतर्गत दिलेली कोणतीही सबसिडी (Subsidy), सहकारी करार (Cooperative Agreement) किंवा इतर सहाय्य तात्काळ थांबवण्याचे किंवा बंद करण्याचे आदेश दिले जात आहेत.”

यापूर्वी, ट्रम्प प्रशासनाने (Administration) शुक्रवारपासून इस्रायल (Israel), इजिप्त (Egypt) आणि फूड प्रोग्राम (Food Programme) वगळता परदेशातील सर्व मदतीवर बंदी घातली आहे.

अमेरिकेच्या राज्य मंत्रालयाच्या (State Ministry) या आदेशात गरीब देशांना आरोग्य मदत देण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

News Title: trump-administration-stops-all-aid-and-projects-to-bangladesh-big-blow-to-yunus-sarkar

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .