ट्रम्प यांच्यासोबतच्या संबंधांबद्दल पोर्नस्टारचा नवा दावा

वॉशिंग्टन | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत शारीरिक संबंध असल्याच्या पोर्नस्टारच्या दाव्यामुळे खळबळ उडाली होती. मात्र त्याच पोर्नस्टारने आता हा दावा फेटाळून लावला आहे. 

स्टॉर्मी डॅनियल असं या पोर्नस्टारचं नाव आहे. काही वृत्तपत्रांनी आपण पैसे घेऊन संबंध लपवल्याचा दावा केला आहे, मात्र तो खोटा आहे, असं स्टॉर्मी डॅनियलनं म्हटलंय. 

दरम्यान, स्टॉर्मी डॅनियलनं सर्वात आधी 2011 साली आपले ट्रम्प यांच्यासोबत शारिरीक संबंध असल्याचा दावा केला होता. तसेच त्यानंतर अमेरिकन अध्यक्षपदाच्या 1 महिना आधीही अशा प्रकारचा दावा तीने केला होता. मात्र त्यावेळी तिच्याकडे कुणी फारसं लक्ष दिलं नव्हतं. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या