बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नरेंद्र मोंदीची का होतेय जेम्स बाँडसोबत तुलना?

नवी दिल्ली | राजकीय नेत्यांना अनेकवेळा सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. कधी ते ट्रोलिंग गंभीर स्वरूपाचं असतं, तर कधी गमतीशीर. आता नरेंद्र मोदींनाही असंच ट्रोल करण्यात आलं आहे. यावेळी त्यांची थेट हॉलिवूड अभिनेता जेम्स बाँडसोबत तुलना करण्यात आली आहे.

तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी नरेंद्र मोदींची तुलना जेम्स बाँडसोबत केली आहे. त्यांनी फेसबुकवरून ही पोस्ट शेअर करत नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ब्रायन यांनी हॉलिवूड सुपरस्टार जेम्स बाँड यांच्या जुन्या चित्रपटाच्या पोस्टरवर नरेंद्र मोदींचा फोटो लावला आहे. त्यांच्या या पोस्टची विशेष चर्चा रंगली आहे.

शिवाय त्यांनी पोस्टच्या खाली नरेंद्र मोदींच्या कामकाजावर निशाणा साधणारं कॅप्शनही दिलं आहे. त्यांनी पोस्टखाली 0 विकास, 0 आर्थिक विकास आणि 7 वर्षे चुकीच्या आर्थिक मॅनेजमेंटची असं कॅप्शन दिलं आहे. 007 हा जेम्स बाँडच्या चित्रपटात त्याच्यासाठी वापरण्यात येणारा नंबर आहे.

ब्रायन यांनी असा फोटो शेअर करत एकप्रकारे नरेंद्र मोदींना खोचक टोला लगावला आहे. जेम्स बाँड हे हॉलिवूडचं अतिशय गाजलेलं नाव आहे. आता ब्रायन यांच्या या पोस्टवर भाजप काय भुमिका घेणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात घट; सर्वसामान्यांना दिलासा

“महाविकास आघाडीमध्ये राहायचं की नाही याचा लवकरच निर्णय घेऊ”

भ्रष्टाचार कितीही मोठा असला तरी केंद्र सरकार त्याची पाळेमुळे खणून काढणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

“राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही! तु मोठी झाली का पाहायचं म्हणत जन्मदात्या बापाने…”

‘या’ कारणामुळे शिवसेना खासदार भावना गवळी दुसऱ्यांदा ईडीच्या चौकशीसाठी गैरहजर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More