बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तृप्ती देसाई यांची पीडितेसह पत्रकार परिषद, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यावर बलात्काराचे आरोप

पुणे | राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांनी एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला आहे. तृप्ती देसाई यांनी पीडितेसह पत्रकार परिषद घेत राजेश विटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

राजेश विटेकरांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. तसेच विटेकर यांनी  माझे अश्लील व्हिडीओ केले आहेत, असा खळबळजमक आरोप पीडितेनं केला आहे.

वर्षभरापासून माझ्यावर अत्याचार करण्यात आला. अद्याप गुन्हा दाखल करत नाहीत. माझ्याकडे पुरावे आहेत, फक्त तपास सुरू असल्याचं सांगतात. शरद पवार यांच्यामुळे गुन्हा दाखल होणार नाही असं राजेश विटेकर म्हणत असल्याचा दावा पीडितेने पत्रकार परिषदेत केला आहे.

दरम्यान, याआधी मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख या नेत्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले होते. तसेच शिवसेनेचे नेते संजय राठोड यांच्यावर देखील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले. तसेच या प्रकरणामुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला.

थोडक्यात बातम्या- 

पुन्हा नशिबी फरपट? लॉकडाऊनची भीती, परप्रांतिय मजुरांची घराकडे जाण्यासाठी धावपळ!

धक्कादायक! भररस्त्यात तरूण उद्योजकाची गोळ्या घालून हत्या

धक्कादायक! पतीसमोरच तिघांनी केला महिलेवर सामुहिक बलात्कार

‘…हे पाहिल्यानंतर मी कधीही मास्क विसरणार नाही’; मुंबई पोलिसांनी दिलेल्या शिक्षेला आनंद महिंद्राही घाबरले

सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More