महाराष्ट्र मुंबई

शिर्डी नगरपंचायत हद्दीमध्ये येण्यास तृप्ती देसाई यांना बंदी!

शिर्डी | शासनाने भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांना शिर्डी नगरपंचायत हद्दीमध्ये आज रात्री बारा वाजल्यापासून ते शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.

शिर्डीचे प्रातांधिकारी गोविंद शिंदे यांनी यासंदर्भात आदेश काढला आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

शिर्डीतील साईबाबा मंदिर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय पोषाखात यावं, अशी विनंती सूचना साईबाबा संस्थानाने भाविकांना केली आहे. यावरून मोठा वाद पेटला आहे.

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी तर हा बोर्ड संस्थानने काढला नाही तर आम्ही तिथे येऊन काढू, असा थेट इशाराच दिला होता. मात्र त्यानंतरही हा बोर्ड हटवला गेला नसल्याने आम्ही 10 डिसेंबर रोजी हा बोर्ड काढण्यासाठी येणार असल्याचं देसाई यांनी लेखी पत्रच साई संस्थानला पाठवलं होतं. त्यानंतर तातडीने साई संस्थान व भूमाता ब्रिगेडच्या वादात प्रशासनाने उडी घेत देसाई यांना शिर्डीत येण्यास बंदी घातली आहे.

थोडक्यात बातम्या-

कृषी कायद्यावर चर्चा होऊच शकत नाही, तो मागेच घ्यावा लागेल- मेधा पाटकर

“…तर तो खऱ्या अर्थाने डिसले गुरुजींचा सत्कार ठरला असता”

“टिकटाॅकवर ओळख झालेल्या महिलेकडून मुलावर बलात्कार”; वडिलांची पोलिसात तक्रार

शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांनी स्वत:ला दिली तानाजीची उपमा; म्हणाले…

“प्राण जाये पर वचन न जाये, अशी शिवसेना आहे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या