तृप्ती देसाई यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी!

केरळ | भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता श्रीजित रमेशन यांनी केली आहे. देसाई या शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यासाठी गेल्या आहेत. मात्र त्यांना विरोधकांनी विमानतळावर अडवून ठेवलं आहे.

श्रीजित रमेशन यांनी याबाबत कोची विमानतळ कमाडंर केरळचे पोलिस महासंचालक आणि एर्नाकुलचे पोलिस आयुक्त यांना आॅनलाईन पत्र दिलं आहे.

कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव ठरावीक वेळेपेक्षा प्रवांशाना विमानतळावर थांबता येत नाही, मात्र तृप्ती देसाई ह्या आपल्या कार्यकर्त्यांसह या ठिकाणी बऱ्याच वेेळेपासून आहेत. त्यामुळे कायद्याचं उल्लघन होत आहे, असं पत्रात लिहिलं आहे.

दरम्यान, एखाद्या साध्या प्रवाशांला असा सुविधा दिली जात नाही, मात्र तृप्ती देसाईंना का दिली जात आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-1 जानेवारीपासून पुण्यात हेल्मेटसक्ती!

-फक्त ‘भारतमाता की जय’ बोलणे म्हणजे राष्ट्रप्रेम नाही!

-दीपिका आणि रणवीरच्या लग्नाला शुभेच्छा देण्यासाठी मला वेळ नाही!

-तुम्ही भांडत बसा, समृद्धी महामार्गाचं नावही आम्हीच ठेऊ!

-सपना चौधरीच्या कार्यक्रमात गोंधळ; चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू