बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केतकी चितळे प्रकरणात तृप्ती देसाईंचा थेट राष्ट्रवादीवर हल्लाबोल, म्हणाल्या…

मुंबई | अभिनेत्री केतकी चितळेने (Ketaki Chitale) पोस्ट शेअर करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली. केतकीने शरद पवारांवर खालच्या शब्दात टीका केल्यानंतर राजकीय नेत्यांसह अगदी सामान्य नागरिकांनीही केतकीला फैलावर घेतलं.

केतकीविरोधात अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी या प्रकरणात आपलं मत व्यक्त केलं आहे. वादग्रस्त वक्तव्यानंतर अडचणीत आलेल्या केतकीची बाजू घेत तृप्ती देसाई यांनी थेट राष्ट्रवादीवर (NCP) हल्लाबोल केला आहे.

तिला अडकवण्यासाठी वेगवेगळे कलम लावणं ही कुठल्या पक्षाची परंपरा आहे? कायदा सगळ्यांना समान आहे. आमच्यावरही अनेकदा आक्षेपार्ह पोस्ट केलं गेलं. आमचंही ट्रोलिंग केलं गेलं. आम्हीही गुन्हे दाखल केले मात्र कोणाला अटक नाही झाली, अशी टीका तृप्ती देसाई यांनी केली आहे. तर जाणूनबुजून पवारांविरोधात लिहिलं असेल तर कारवाई करा पण तिला ट्रोल करणाऱ्या राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांवर कारवाई का नाही? असा सवाल देखील तृप्ती देसाईंनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, केतकी चितळेनं जी आक्षेपार्ह पोस्ट टाकली त्यामध्ये पवार असा उल्लेख होता. शरद पवार असं पूर्ण नाव लिहिलेलं नाही. त्यामुळे ते नेमकं शरद पवारांबद्दलच बोललं आहे का या विषयावर कदाचित न्यायालयामध्ये ही केस टिकू शकणार नाही, असं वक्तव्य तृप्ती देसाई यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

राष्ट्रवादीच्या आंदोलनावर स्मृती ईराणींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

‘केतकीचं समर्थनच काय फडणवीसांनी सांगितलं तर सदाभाऊ साडी घालून…’; राष्ट्रवादीची बोचरी टीका

‘हिंमत असेल तर…’; भाजप नेत्याचं उद्धव ठाकरेंना थेट आव्हान

अयोध्या दौऱ्यापूर्वी राज ठाकरेंचा मोठा निर्णय, आता लवकरच…

‘काश्मिरी पंडितांवरील हल्ले थांबवायचे असतील तर आधी…’; फारूख अब्दुलांच्या वक्तव्याने खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More