बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तृप्ती देसाईंची रूपाली चाकणकरांवर खोचक शब्दात टीका, म्हणाल्या…

मुंबई | भाजप नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) दोन दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर आल्या होत्या. स्मृती इराणींच्या पुणे दौऱ्यादरम्यान मोठा राडा झालेला पाहायला मिळाला. राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी स्मृती इराणींविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादी (NCP) व भाजपचे (BJP) कार्यकर्ते आपआपसात भिडले.

भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांवर हात उचलल्यानंतर वातावरण अधिकच तापलं. राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांवर झालेल्या मारहाणीची महिला आयोगाने गंभीर दखल घेतली. यावरून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तृप्ती देसाई यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या व महिला अयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्य महिला आयोगाचं नाव बदलून राष्ट्रवादी महिला आयोग केलं पाहिजे. कारण महिला आयोगाच्या अध्यक्षा कायम भेदभाव करताना दिसत आहेत, असा घणाघात तृप्ती देसाई यांनी केला आहे.

दरम्यान, स्मृती इराणींच्या पुणे  दौऱ्यावरून राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. तृप्ती देसाईंच्या टीकेला रूपाली चाकणकर काय प्रत्युत्तर देणार हे बघावं लागेल.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! राज ठाकरेंची पुण्यातील सभा रद्द, ‘हे’ मोठं कारण आलं समोर

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस वाढली, संजय राऊतांच्या वक्तव्याने खळबळ

केतकी चितळे प्रकरणाला नवं वळण, ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर

‘आम्ही चवन्नी छाप, भाडोत्री लोक ठेवणार नाही तर…’; नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य

किरीट सोमय्यांचा संजय राऊतांना दणका, उचललं ‘हे’ मोठं पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More