बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनेक महिलांच्या शिव्या-शापाने हे सरकार कोसळेल- तृप्ती देसाई

मुंबई | अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्यांसह चंद्रपूरमधील शेकडो गावांनी दारुबंदी कायम ठेवण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं. मात्र ठाकरे सरकारने हा विरोध झुगारुन चंद्रपूरमधील दारु बंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे भाजप नेत्यांकडून सरकारवर टीका केली जात आहे.

चंद्रपुरमधील दारुबंदी हटवण्याच्या सरकारच्या निर्णयावरून भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. तृप्ती देसाई यांनी ठाकरे सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे.

चंद्रपुरातील दारूबंदी उठवली म्हणजे सरकारने पुन्हा एकदा जिल्ह्यातील महिलांच्या संसाराची राखरांगोळी होण्यासाठी दारे खुली केली असंच म्हणावं लागेल. सध्या राज्यात कोरोना महामारीची लाट आहे. त्यात लॉकडाऊन सुरू आहे. दररोज शेकडो नागरिकांचा मृत्यू होत आहे. अशातच दारूबंदी उठवावी असा क्रूर निर्णय कोणीही घेऊ शकत नाही परंतु महाराष्ट्रातील सरकारने हा निर्णय घेतलाय, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.

दारुमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले. अनेक तरुण व्यसनाधीनतेकडे वळले आणि म्हणूनच जनआंदोलनातून चंद्रपुरात दारूबंदीचे आंदोलन सुरू झालं आणि ते यशस्वीही झालं. मात्र सरकारचा हा दारूबंदीचा निर्णय म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असाच आहे. कदाचित या निर्णयामुळे अनेक महिलांचा या सरकारला शिव्या-शाप लागून हे सरकार पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा घणाघात तृप्ती देसाई यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

चेन्नई संघाला मोठा धक्का! कर्णधार धोनीचा CSK ला गुडबाय?; भारताच्या माजी खेळाडूचा खुलासा

तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन व्हिडीओ शूट करणाऱ्या पाच नराधमांना अटक!

भारतात कोरोनामुळे 42 लाख मृत्यू झाल्याचा न्यूयॉर्क टाइम्सचा दावा केंद्रानं फेटाळला!

लसीकरण करताना दोन वेगवेगळ्या कंपनीचे डोस घ्यावेत का?; डाॅक्टरांनी दिला ‘हा’ सल्ला

मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले; तुफान हाणामारीत मनसे नेते प्रविण मर्गज जखमी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More