तृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार; केरळ सरकारकडे सुरक्षेची मागणी

पुणे | येत्या 17 नोव्हेंबरला भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई केरळला जाणार आहेत. त्या तिथं शबरीमला मंदिरात प्रवेशही करणार आहेत. त्यामुळे त्यांनी केरळ सरकारकडे सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे.

16 नोव्हेंबरपासून शबरीमाला मंदिराचे दरवाजे मंडळा-मकराविलाकू उत्सवानिमित्त पुन्हा उघडण्यात येणार आहेत. त्याच सुरुवातीला मंदिरात प्रवेश करणार असल्याचं तृप्ती देसाईंनी म्हटलं आहे. 

मंदिरातील महिलांच्या प्रवेशाला विरोध करणाऱ्यांकडून धमक्या येत आहेत. त्यामुळे सुरक्षा पुरवण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. 

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने प्रवेशाची परवानगी देऊनही प्रवेशाला विरोध करणारे आहेत तरी कोण?, असा सवालही त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-दिवाळी संपताच जिओचा बंपर धमाका; ‘हा’ प्लॅन घ्या आणि 100% कॅशबॅक मिळवा

-मोदी, केजरीवालांनी ऐकले नाही म्हणून थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे तक्रार!

-कुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी खेळायचा; दुखापतीमुळे 13 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू

-उद्धवजी, राम मंदिर बांधायला जाताना लक्षात ठेवा…आमची 53 मंदिरे भुईसपाट होणार आहेत!

-मराठा समाजाचा वेगळा पक्ष काढून काय करणार?; विनायक मेटेंचा सवाल