पुणे | जर तू इंदुरीकर महाराजांच्या विरोधातील तक्रार मागे घेतली नाही तर तू अकोल्यात ये तुला कापून टाकतो, अशी धमकी तृप्ती देसाईंना अकोले तालुक्यातील भोर येथील सोमनाथ महाराजांनी दिली आहे. याबाबत हे असं करायला इंदोरीकर महाराजच सांगत असल्याचा आरोप तृप्ती देसाईंनी केला आहे.
तू कुत्री आहेस, नालायक आहेस असं म्हणत तुझी पैदास कुठली आहे. तू एका बापाची पैदास नाहीस. तू महिला नाही तर हिजडा आहेस, अशी अश्लिल कमेंट करत शिवीगाळ केली असल्याचं देसाईंनी सांगितलं आहे.
मला कापून टाकण्याची भाषा हे महाराज करत असल्यामुळे पुन्हा एकदा इंदोरीकर आणि त्यांच्या समर्थकांकडून मला आणि माझ्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशन येथे मेलद्वारे काल मी तक्रार दाखल केली असल्याचंही देसाईंनी सांगितलं आहे.
दरम्यान, इंदोरीकरांनी आपण केलेल्या वक्तव्या प्रकरणी पत्राद्वारे माफी मगितल्यावर हे प्रकरण कुठे तरी थांबलं असं वाटत असताना आता पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
वाघ आहे का बेडूक; मनसेची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
‘उद्धव ठाकरेंनी आधी CAA कायदा समजून घ्यावा’; काँग्रेस नेत्याचा सल्ला
महत्वाच्या बातम्या-
राज्य 60व्या वर्षात पदार्पण करतंय अन् मी 80 व्या, या वयात आपण थांबायचं…- शरद पवार
वाघ आहे का बेडूक; मनसेची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
‘उद्धव ठाकरेंनी आधी CAA कायदा समजून घ्यावा’; काँग्रेस नेत्याचा सल्ला
Comments are closed.