बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बिग बॉस’चा आवाज पुरुषाचाच असल्यामुळे…’; बेधडक तृप्ती देसाईंचा गौप्यस्फोट

मुंबई | तब्बल दोन वर्षांनंतर बहुचर्चित बिग बॉस मराठी सिझन 3 प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोची प्रतिक्षा चाहते खुप दिवसांपासून करीत होते. यंदाच्या बिग बॉस मराठी सिझनमध्ये बॉलिवुड कलाकारांनासोबतच सामाजिक कार्यकर्त्यां आणि भूमिका ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई या देखील बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या आहेत. अशातच आता तृप्ती देसाईंनी हिंदीमधील बिग बॉस विषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

मला हिंदी बिग बॉसमध्ये बोलवलं होतं, परंतु मी त्यांना सांगितलं होतं की, जर बिग बॉसचा आवाज महिलेचा असेल तर मी हिंदी बिग बॉसमध्ये येणार, आता ही मी त्यांना सांगितलं आहे की, पुढ्च्या सिझनमध्ये तुम्ही बिग बॉसचा हिंदीमध्ये महिलेचा आवाज करत असेल तर मी येते. म्हणून मी हिंदी बिग बॉसमध्ये गेले नाही, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.

बिग बॉस 3 मराठीसाठी तृप्ती देसाई, किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील, मीनल शहा, आणि  सुरेखा कुड या व्यक्ती स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. जर बिग बॉस मध्ये 15 महिला असत्या तर शो हिट झाला असता, असं बिग बॉस मध्ये शिवलीला बोलताना दिसल्या. त्यानंतर तृप्ती देसाईंनी हिंदी बिग बॉसविषयी बोलल्या.

दरम्यान, गेल्या काही वर्षापासून हिंदीमधील बिग बॉस हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्या शोमध्ये अभिनेता सलमान खान सुत्रसंचालन करीत आहे. याच शोच्या धर्तीवर मराठी प्रेक्षकांसाठी बिग बॉस 3 मराठीतून हा शो सुरू करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘बाळाचे डायपर्सही इतक्या वेळा बदलत नाहीत तेवढ्या वेळा…’; सेहवागचा पंजाब किंग्सवर निशाणा

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर, आजही दरात घसरण

‘काम कोणाचं आणि नाचतंय कोण? कधीतरी खरं बोला’; दोन राजेंमध्ये पोस्टर’वाॅर’

‘तुम्ही माझ्या पाया नका पडू, मीच तुमच्या पडतो’; ‘या’ मराठमोळ्या कलाकारासमोर झुकले महानायक!

महिला सुरक्षेबाबत नाना पटोलेंचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More