मुंबई | ह.भ.प. इंदुरीकर महाराज देशमुख यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर कारवाई करा, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन केली आहे. महाराजांवर पीसीपीएनडीटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे, असंही त्या म्हणाल्या आहेत.
रात्री-अपरात्री फोन करून मेसेज करून इंदुरीकर यांच्या नादाला लागू नका अन्यथा याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, अशा धमक्या येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यात सूमोटो ऍक्शन घ्यावी, यासाठी तृप्ती देसाई यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली. महाविकास आघाडी सरकार महिलांचा अपमान करणाऱ्या महाराजांबरोबर आहे की महिलांसाठी काम करणार्या कार्यकर्त्यांसाठी? महाविकास आघाडी सरकार याबाबत काहीच कसे करत नाही,असा प्रश्नही तृप्ती देसाई यांनी अनिल देशमुख यांना विचारला.
इंदुरीकर महाराजांचे समर्थक मला अश्लील शिवीगाळ करून माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहेत. तसेच मला नग्न करून ठार मारण्याची भाषा, धमक्या देत आहेत. अशा चार ते पाच हजार धमक्या माझ्याकडे आहेत, माझा संपर्क क्रमांक अनेक सोशल मीडियाच्या ग्रुपमध्ये पाठवून मला धमक्या देण्यासाठी आणि मानसिक त्रास देण्यासाठी इंदुरीकर महाराजांच्या सांगण्यावरून माझा नंबर वायरल करण्यात आला आहे, असा आरोप देसाई यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, मलाही इंदुरीकर यांनी केलेली विधाने पटलेली नाहीत आणि अंधश्रद्धा पसरवणारी आहेत, त्यांच्यावर आणि त्यांच्या समर्थकांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करू, यासाठी “तुम्ही मला तुम्हाला आलेल्या धमक्यांचे स्क्रीनशॉट पाठवा आणि इंदुरीकरांचे महिलांचा अपमान करणारे वक्तव्याचे व्हिडिओ पाठवा “कारवाई होईल असे अनिल देशमुख यांनी तृप्ती देसाई यांना सांगितल्याचं कळतंय.
ट्रेंडिंग बातम्या-
शेती करताना तरी इंंदुरीकरांनी कामासाठी येणाऱ्या महिलांशी नीट बोलावं- तृप्ती देसाई
…म्हणून नरेंद्र मोदी माझ्या शपथविधीला गैरहजर राहिले- अरविंद केजरीवाल
महत्वाच्या बातम्या-
शिवसेनेच्या शाखाप्रमुखासारखे काम करा; पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सूचना
हिंमत असेल तर पुन्हा निवडणुकीला सामोरं जाऊन दाखवा; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
महाराष्ट्रात भाजपची सत्ता आणल्याशिवाय शांत बसणार नाही- देवेंद्र फडणवीस
Comments are closed.