पुणे | महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे, अशातच पुण्यात राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी मांसप्रेमींसाठी वशाटोत्सवाचं आयोजन केलं आहे. राज्यभरातून शेकडोच्या संख्येनं इथं गर्दी होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे राज्यात शिवजयंतीसारख्या कार्यक्रमांवर निर्बंध लादलेले असताना अशा कार्यक्रमांना परवानगी दिल्यानं शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात वशाटोत्सवाचे आयोजन केले आहे आणि असं समजतंय की या कार्यक्रमाला पवार साहेब, संजय राऊतसाहेब ,धनंजय मुंडे आणि इतर प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. मग या उत्सवाला परवानगी कुणी दिली? या उत्सवामध्ये सुद्धा 100 जणांनी सहभागी व्हायचे, असे निर्बंध का नाही लादले? जसं दिल्लीत तबलिगी प्रकरण गाजले होते त्याची पुनरावृत्ती या गर्दीतून झाली तर मग कोण जबाबदार?, असा सवाल तृप्ती देसाई यांनी विचारला आहे.
महाविकास आघाडीतील सत्ताधारी पक्षांना व त्यांच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना वेगळे नियम लागू आहेत का? आणि त्यांना सर्व सूट आहे का? याचे उत्तर या सर्व नेत्यांनी द्यावे, असा सवालही त्यांनी केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंतीवर निर्बंध, अनेक ठिकाणी जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्याचे आदेश आहेत, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात एकही नेता त्यांच्या घरी सांत्वनाला जात नाही. परंतु हे सर्व नियम सर्वसामान्यांना लागू आहेत का? असा प्रश्न पडत आहे, असं तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.
थोडक्यात बातम्या-
संजय राठोड यांच्या चौकशीबाबत पुणे पोलिसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…
शिवभक्त म्हणून माझाही हिरमोड झाला, पण…- अमोल कोल्हे
काही साप चावतात तर काही चावत नाही, त्यांना ठेचायचं असतं- उद्धव ठाकरे
ऐकावं ते नवलंच! गर्लफ्रेंडला प्रेग्नंट करून तिच्या आईसोबत बॉयफ्रेंडचं पलायन
अजितदादांच्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी ‘ती’ भााषा शिकणार- उद्धव ठाकरे