शबरीमाला प्रवेशावेळी गोंधळ झाला तर त्याला सरकारच जबाबदार असेल!

मुंबई | केरळ सरकारकडे सुरक्षेच्या मागणीला प्रतिसाद न दिल्याने भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई संतापल्या आहेत. शबरीमला मंदिरात प्रवेशावेळी काही गडबड गोंधळ झाला तर त्याला केरळ सरकार जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

17 नोव्हेंबरला मी केरळला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने आदेशाप्रमाणे शबरीमला मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून मी जाणार आहे. त्यासाठी मी केरळ सरकारला सुरक्षेची मागणी केली होती. मात्र त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही, असं देसाईंनी सांगितलं. 

दरम्यान, सुरक्षा नसल्याने मंदिर प्रवेशावेळी काही चुकीचं घडल्यास त्याची जबाबदारी सरकार आणि पोलीस महासंचालकांची असेल, असं त्यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-मनेका गांधींना माझा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही- सुधीर मुनगंटीवार

-वादग्रस्त जागेवर स्वतःचं मंदिर उभारावं अशी इच्छा खुद्द रामचंद्रांची नसेन!

-मराठ्यांनी 1 डिसेंबरला जल्लोषासाठी तयार रहावे- देवेंद्र फडणवीस

-ओवेसीसारख्या गद्दारांनी पाकिस्तानातून निवडणूक लढवावी!

-भारतासारख्या गरीब देशात जाऊन चूक केली; ‘या’ खेळाडूचं वादग्रस्त वक्तव्य