मुंबई | भाजपचं सरकार जाऊन महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर वाटलं होतं की यांच्या राज्यात तरी सर्वांना समान न्याय भेटेल पण तसं घडताना सध्या तरी पाहायला मिळत नाही, अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली आहे.
तृप्ती देसाई यांनी वाधवान प्रकरण, करमुसे प्रकरण तसंच पत्रकार राहुल कुलकर्णी यांच्या अटक प्रकरणावर दीर्घ भाष्य केलं. सर्वसामान्यांसाठी वेगळा न्याय आणि मंत्री, श्रीमंतांसाठी आणि आपल्या मर्जीतील लोकांसाठी वेगळा न्याय अशी व्याख्याच गृहमंत्रालयाच्या सध्याच्या कारवाईनुसार होत आहे, अशा शब्दात त्यांनी तिन्ही प्रकरणी आपली नाराजी बोलून दाखवली.
गृहमंत्रालयाचे सचिवच लॉकडाउन उल्लंघन करून अतिश्रीमंत वाधवान कुटुंबियांना पास देतात. करमुसे प्रकरणात अश्लील पोस्ट टाकल्या म्हणून त्याला कायद्यानुसार अटक केली परंतु त्याला ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर गुन्हा जरी दाखल झाला असला तरी त्यांना मात्र अटक केलेली नाही. मात्र राहुल कुलकर्णी सारख्या पत्रकारावर तातडीने गुन्हा दाखल होतो आणि अटकही होते. हा भेदभाव का? असा सवाल तृप्ती देसाई यांनी केला.
दरम्यान, आम्ही कायदा मानणारे लोक आहोत. आमचा कायद्यावर विश्वास आहे आणि राहिल. परंतू जर कायदा धाब्यावर बसवून नियम बनवले जात असतील तर भविष्यात जनतेचा कायद्यावरचा विश्वास नक्कीच कमी होऊ शकतो, अशी भिती त्यांनी व्यक्त केली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
चीनचा भारताला मदतीचा हात; पाठवले साडे 6 लाख रॅपिड किट
महत्वाच्या बातम्या-
देश लॉकडाऊन, कर्नाटकात मात्र थाटामाटात पार पडला माजी पंतप्रधानांच्या नातवाचा विवाहसोहळा
“रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार द्या”
….तर आम्ही सामूहिक राजीनामा देऊ; ससूनच्या निवासी डॉक्टरांचा इशारा
Comments are closed.