बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्वप्ना पाटकर प्रकरणारुन तृप्ती देसाई संजय राऊतांविरोधात आक्रमक, म्हणाल्या…

पुणे | शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे आपला छळ करत असल्याचा आरोप चित्रपट निर्मात्या डॉ. स्वप्ना पाटकर यांनी सोशल मीडियावर केला आहे. या प्रकरणावर आता भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

स्वप्ना पाटकर यांनी केलेले आरोप धक्कादायक आहेत. संजय राऊत हे त्यांच्या आक्रमक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. परंतु महिलांना धमकी देणं ,छळ करणं हे त्यांचं रूप कोणालाही माहित नव्हतं ते स्वप्ना पाटकर यांनी केलेल्या आरोपावरून माहिती झालं, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलंय.

सत्तेच्या जोरावर महिलांचा छळ करणं आणि तिने तक्रार दाखल करु नये म्हणून तिच्यावरच खोट्या नाट्या तक्रारी दाखल करणं किंवा दाखल करण्याच्या धमक्या देणं, दादागिरी करणं, पिडितेलाच खोटं ठरवणं सध्याच्या राजकीय नेत्यांची फॅशन झाली आहे. हे आपण धनंजय मुंडे प्रकरण ,महबूब शेख प्रकरण, पूजा चव्हाण प्रकरण आणि राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर प्रकरणात अनुभवले सुद्धा आहे, असं देसाई म्हणाल्यात.

संजय राऊत यांसारख्या शिवसैनिकांने महिलांबाबत असे विचार ठेवणे आणि कृती करणे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या संस्कारांचाच अपमान आहे. नीलमताई गोरे आणि सुप्रिया ताई सुळे यांना भेटूनही त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केलं गेलं. पाटकर यांनी या दोघींचीही भेट घेतल्यानंतर ते तातडीने राऊत यांना कळवलं गेलं असं स्वप्नाजी पाटकर यांनी तक्रारीत लिहिलं आहे. स्वप्ना पाटकर यांनी जो न्याय मागितला आहे त्यांना तो न्याय मिळाला पाहिजे. स्वप्ना पाटकरजी आम्ही आपल्या बरोबर आहोत फक्त न्यायाची लढाई न डगमगता शेवटपर्यंत लढा, असं तृप्ती देसाई म्हणाल्यात.

थोडक्यात बातम्या- 

“कोरोना मानसिक आजार, त्यामुळे मरणारी माणसं जगण्याच्या लायकीची नाहीत”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस!

शेतकऱ्यांना दिलासा; उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

वास्तव नाकारून चालणार नाही, लोकांचे जीव वाचवण्यासाठी कठोर निर्बंध गरजेचे आहेत- शरद पवार

पत्नीने सासरी परत येण्यास दिला नकार, त्यानंतर नवऱ्याने जे केलं त्याने पुणे हादरलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More