पुणे | वीज बिलात सूट द्या अन्यथा सर्वसामान्य नागरिकांना तुमची सुट्टी करायला वेळ लागणार नाही, असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी सरकारला दिला आहे.
गेली सात ते आठ महिने झाले महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट आहे. लाॅकडाऊन मुळे सर्वजण घरी होते, आत्ता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असून आठ महिन्यांचे संपूर्ण बिल सर्वसामान्यांना भरणे शक्य नाही. बिलावर आणि वाढीव वीज बिलावर कोणतीही सवलत सरकार देणार नाही,वीजबिल भरावे लागेल असे ऊर्जामंत्र्यांनी सांगितले आहे. पण आत्ता सर्वसामान्यांना हे शक्य नाही, असं तृप्ती देसाई म्हणाल्यात.
जसे सरकार आर्थिक अडचणीत होते तसेच सर्वसामान्य सुद्धा आर्थिक अडचणीत आहेत याचा सरकारने विचार केला पाहिजे होता. त्यामुळे मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्र्यांनी वीज बिलावर सूट द्यावी, अन्यथा सर्वसामान्य जनता तुम्हाला सुट्टी दिल्याशिवाय राहणार नाही, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, वाढीव वीज बिलातून कोणताही दिलासा मिळणार नाही. मीटर रिडिंगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत असं उर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
“आम्ही विधान परिषदेच्या सहाच्या सहा जागा जिंकणार, कुणी पलायन केलं तरी पक्षाला फरक पडत नाही”
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाची नोटीस
शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी भाजपची नीती आहे- विजय वडेट्टीवार
“साधू-संतांच्या हत्येविरोधात आवाज उठवणंही ठाकरे सरकारच्या काळात गुन्हा”
लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करा, अन्यथा… राजू शेट्टी