बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“इंदुरीकर त्यांच्या कीर्तनातून महिलांबाबत बदनामीकारक वक्तव्य करत होते तेव्हा ही कुठे होती ?”

पुणे | प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी सध्या तिच्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. हेमांगीच्या या पोस्टनंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अनेक कलाकारांनी तिचे समर्थन केलं आहे. तसेच हेमांगीला ट्रोलही केलं जात आहे. याच संदर्भात आता भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

इतर वेळी जेव्हा स्त्रियांच्या वेशभूषांबाबत समाजातील दिग्गज व्यक्ती टिप्पणी करतात तेव्हा हे विरोध करण्यासाठी पुढे का नाही येत नाही, असा सवाल तृप्ती देसाई यांनी केला आहे. त्यांनी या संदर्भात एक फेसबुक केली आहे.

सदर अभिनेत्री आम्ही शिर्डीच्या ड्रेसकोड च्या विरोधात रान पेटवले तेव्हा कुठे होत्या मला माहित नाही. त्यांच्या या जाहीर लेखाचे स्वागतच आहे , सर्वांनीच आता जाहीरपणे व्यक्त होणे ही काळाची गरज आहे.परंतु मला त्यांना आवर्जून सांगायचे आहे की ज्या महिला या संदर्भात गॉसिप्स करतात किंवा उघडपणे बोलत नाहीत, किंवा विकृत मानसिकतेचे पुरुष असोत त्यांचीच तर मानसिक बदलण्यासाठी आमचाही प्रयत्न आहे आणि तो करताना ट्रोलिंग, शिवीगाळ, हल्ले याला आम्हालाही सामोरे जावे लागले. परंतु त्यावेळी मात्र ना प्रवीण तरडे यांनी जाहीर पाठिंबा दिला, ना हेमांगी यांनी, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलंय.

जेव्हा महिलांना मासिक पाळी या विषयावरून दुजाभाव केला जातो, अनेक ठिकाणी बंदी घातली जाते याविषयीही आम्ही कृतीत आंदोलने केली परंतु अशा वेळेला असे लोक का साथ देत नाहीत हे समजले नाही. इंदुरीकर तर जाहीरपणे महीलांच्या वेशभूषा वर आणि महिलांबाबत बदनामीकारक वक्तव्य अनेक कीर्तनातून करत असत त्यावेळेला हे सर्व कुठे होते असाच प्रश्न पडतो?, असं म्हणत त्यांनी यावेळी इंदुकरीकर महाराज यांच्यावर निशाणा साधला.

थोडक्यात बातम्या- 

विद्यार्थ्यांना आता ‘या’ देशात शिकण्याची संधी; राज्यपालांच्या उपस्थितीत योजनेचा शुभारंभ

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

“चार मुलं असलेले भाजपचे खासदार रवी किशन लोकसंख्या नियंत्रण विधेयक मांडणार”

महत्वाची बातमी! पुण्यात सीरम इन्स्टिट्यूट तयार करणार रशियन कोरोना रस

खुशखबर! सोन्याचे दर सर्वोच्च स्तरापेक्षा तब्बल दहा हजार रुपयांनी उतरले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More