पुणे | मंदिरातील पुजारी अर्धनग्न असतात. मग भक्तांच्या कपड्यांबाबत निर्बंध का?, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला आहे.
शिर्डीतील साईमंदिरात दर्शन घेण्यासाठी येत असाल तर भारतीय पेहरावात यावे. तोकडे कपडे घालून मंदिरात येऊ नये, असं आवाहन साई संस्थानतर्फे करण्यात आलं. यावर तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिर्डीच्या साईबाबा मंदिरात भक्तगण देश-विदेशातून येतात. हे भक्त वेगवेगळ्या जातीधर्माचे असतात. शिर्डी संस्थानने मंदिर परिसरात भक्तांनी सभ्य पोशाख घालून यावं या आशयाचा एक बोर्ड लावला आहे. भारत देशात संविधान आहे. संविधानाने अभिव्यक्ती आणि व्यक्तिस्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळे कुणी काय बोलाव?, काय बोलू नये हा?, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हा संविधानाचा आपमान आहे, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.
मंदिरामध्ये कशा पद्दतीचे कपडे घालायला पाहिजेत याचे भान भक्तांना आहे. भक्तांची श्रद्धा कपड्यांवरुन ठरवू शकत नाहीत. श्रद्धा महत्वाची असते, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
विहंग सरनाईक ईडीच्या चौकशीला गैरहजर; कारवाई होण्याची शक्यता
“पवार साहेबांनी मला आमदार करायचं ठरवलं तर तुमच्या मतदानाची गरज पडणार नाही”
‘या’ कारणामुळे न्यूझीलंडमधून पाकिस्तानचा संपूर्ण संघ होऊ शकतो हद्दपार!
उर्मिला मातोंडकरांच्या शिवसेना प्रवेशावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले…
पंकजा मुंडे यांची तब्येत बिघडली; आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय