पुणे | महाराष्ट्रात सध्या महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पूजा आत्महत्या प्रकरण सध्या महाराष्ट्रात चर्चेत आहे. या प्रकरणामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील शिवसेना नेते संजय राठोड यांचं नाव घेतलं जात आहे. या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत. मात्र अशातच समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. याच पार्श्वभूमीवर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी अबू आझमींवर निशाणा साधला आहे.
महिला पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये वर्षभर एकत्र राहतात आणि नंतर सांगतात माझा बलात्कार झाला, असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलं होतं. यावर नेतेमंडळी महिलांना बदनाम करण्यासाठी असे स्टेटमेंट करत असल्याचं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.
अनेक नेत्यांचं नाव सध्या बलात्कार प्रकरणांमध्ये आल्यामुळे त्यांना वाचविण्याचं काम त्यांचे सहकारी, पक्ष आणि आघाडी करत आहे. म्हणूनच मग महिला कशा चुकीच्या आहेत हे सांगण्याचा प्रयत्न अबू आझमींच्या माध्यमातून केला गेला म्हणजे महिलांना बदनाम करण्याचा डाव सध्या राजकारण्यांच्या माध्यामातून होत असल्याचं देसाई म्हणाल्या.
दरम्यान, देशाचा कायदाच चुकीचा आहे. कायद्यानुसार कुठलीही स्त्री लग्नाशिवाय कुठल्याही व्यक्तीसोबत राहू शकते. लिव्ह इन रिलेशन म्हणजे काय आहे? तर तुम्ही एका महिलेला पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्यात कुठलाही गुन्हा नाही, वर्षभर एकत्र राहतील आणि नंतर सांगतील माझा बलात्कार झाला, असं अबू आझमी म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
‘…हा तर सरकारच्या अस्तित्वहीनतेचा पुरावा’; गजानन मारणेनेेने काढलेल्या मिरवणुकीवरून चित्रा वाघ आक्रमक
आज ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं; पाहा काय आहे भाव…
तहानलेल्या सापाला वनाधिकाऱ्याने बाटलीने पाजलं पाणी, पाहा व्हिडिओ
फास्ट-टॅगवरून मनसे नेत्या रूपाली ठोंबरेंचा टोल नाक्यावर राडा, व्हिडीओ व्हायरल!
…म्हणून महाराष्ट्रात पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं- आशिष शेलार