Top News महाराष्ट्र मुंबई

“धनंजय मुंडे यांनी जनाची नाहीतर मनाची लाज ठेवून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा”

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांंच्यावर बलात्काराचा आरोप रेणू शर्मा नावाच्या तरूणीने केला आहे. मुंडेंनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याच पार्श्वभूमीवर भूमात ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली आहे.

धनंजय मुंडेंनी सांगितलं की आम्ही सहमतीने संबंधात होतो तेव्हा त्यांच्या म्हणण्यातून, ‘एक तरफ घरवाली तर एक तरफ बाहरवाली’, असा चुकीचा संदेश समाजात चुकीचा संदेश चालला असल्याचं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडेंनी तातडीने जनाची नाही तर मनाची लाज ठेवून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असंही देसाई यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच महिलांनी कुठल्याही कायद्याचा गैरवापर करणं हे चुकीचं आहे असल्याचंही देसाई म्हणाल्या.

दरम्यान, जेव्हा एखादी मोठी व्यक्ती मोठ्या स्तरावर काम करत असते तेव्हा माझं कोणीही काही वाकडं करू शकत नाही, मी मंत्री आहे, यंत्रणा माझ्यात हातात आहे, अशा जेव्हा धमक्या येतात तेव्हा महिलांना चुकीचं माननं गरजेचं असल्याचं देसाई यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

क्रिकेटची हत्या केली म्हणणाऱ्या भाजप खासदाराला हनुमा विहारीचा रिप्लाय, सेहवागला हसू आवरेना

एनसीबीने जावयाच्या घरी धाड टाकल्यानंतर नवाब मलिकांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

संकटं येतच राहतात मात्र सत्याचा पराभव कधीच होत नाही- रेणू शर्मा

महिलेसोबत नको त्या गोष्टीवर चर्चा; तीन यूट्यूबर्सना पोलिसांकडून अटक

Freedom 251 मोबाईल आठवतो का?, त्याच्या मालकाला नव्या घोटाळ्यात अटक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या