बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आमच्या आंदोलनानंतर इंदोरीकर महाराजांची 80 टक्के कीर्तने…’; बिग बॉसमध्ये तृप्ती देसाईंचा गौप्यस्फोट

मुंबई | प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी एका कीर्तनात सम तारखेला स्त्रीसंग केल्यास मुलगा होतो, आणि विषम तारखेला स्त्रीसंग केल्यास मुलगी होते, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावेळी भूमाचा ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी इंदोरीकरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता पुन्हा एकदा तृप्ती देसाईंनी इंदोरीकरांविरोधात वक्तव्य केलं आहे.

मराठी बिग बॉसच्या 3 ऱ्या सीझनमध्ये कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील, मीनल शाह, सुरेखा कुडची आणि तृप्ती देसाईसुद्धा आहेत. बिग बॉसमध्ये शिवलीला पाटील, मीनल शाह आणि सुरेखा कुडची बोलत असतात. त्यावेळी शिवलीला म्हणतात की, या तृप्ती देसाई यांनी इंदोरीकरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. मी पुराव्यांच्या आधारे कीर्तन सांगत असल्याचं त्यांनी सांगितलं.

हे ऐकून तृप्ती देसाई म्हणतात, इंदोरीकरांची बरीच कीर्तन ही महिलांचा अपमान करणारी होती, आम्ही त्यांच्याविरोधात आंदोलन केलं होतं. आमच्या आंदोलनानंतर त्यांची अनेक कीर्तन यु ट्यूबवरून डीलीट करण्यात आलीत. त्यानंतर शिवलीला म्हणतात की, त्यावेळी अनेक कीर्तनकारांनी आपली कीर्तन डीलीट केली होती.

दरम्यान, त्यावेळी आम्ही मोहिम चालवली होती कारण संपुर्ण जिल्हा माझ्याविरोधात उभा होता, मी जाणार म्हटल्यावर 100 किमी अलिकडे मला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, असं तृप्ती देसाई यांनी सांगितलं. बिग बॉसच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यावेळच्या देसाई आणि इंदोरीकरांमधील संघर्ष आठवला.

थोडक्यात बातम्या- 

दिलासादायक! राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट

कोरोना अपडेट! मुंबईच्या आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

टीईटी परीक्षा पुढे ढकलली, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केली नवीन तारीख

येत्या 48 तासात ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार… वाचा हवामान खात्याचा अंदाज!

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना बसणार चाप, आता होणार थेट वाहन जप्तीची कारवाई!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More