बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘इतकं लाचार कधीच वाटलं नाही…’; कोरोनाची परिस्थिती सांगताना डॉक्टरला अश्रू अनावर

मुंबई | देशात कोरोना रूग्णांची वाढतच चालली आहे. विशेषत: मुंबई पुण्यात कोरोना रूग्ण झपाट्याने वाढत आहे. रूग्णांना कुठे बेड मिळेना तर कुठे ऑक्सिजन. मुंबईतील कोरोनाची परिस्थिती सांगताना तर मुंबईतील एका तज्ज्ञ डॉक्टरलाही अश्रू अनावर झाले.  डॉ. तृप्ती गिलाडा कोरोनाची सद्यस्थिती सांगत असताना ढसाढसा रडू लागल्या.

अशी परिस्थिती मी याआधी कधीच पाहिली नाही. आम्ही खूप हतबल आहोत. इतर डॉक्टरांप्रमाणे मीसुद्धा घाबरले आहे. काय करावं ते समजत नाही. मुंबईची हालत खूप खराब आहे. मला इतकं हतबल, लाचार कधीच झाल्यासारखं वाटत नाही असं सांगतांना त्यांना अश्रू अनावर झाले.

तुम्हाला ताप आला तर पॅनिक होऊ नका. लगेच रुग्णालयात दाखल होऊ नका. असं घाबरून अनेक लोक रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळे आणि ज्यांना खरंच गरज आहे त्यांना बेड्स मिळत नाहीत. आम्हाला अनेक रुग्णांना घरीच उपचार द्यावे लागत आहेत. मी तुम्हाला विनंती करते, स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला वाटतं की तुम्हाला वर्षभर कोरोना झाला नाही. म्हणजे तुम्ही सुपरहिरो आहात. तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे तर असं बिलकुला नाही. आम्ही अनेक तरुणांना पाहतो आहोत. अगदी 35 वयातील लोकही वेंटिलेटरवर आहेत, असं डॉ. तृप्ती गिलाडा यांनी सांगितलंय.

दरम्यान, मंगळवारी मुंबईत दिवसभरात 7 हजार 214 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 9 हजार 641 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच मुंबईत 35 जणांचा मृत्यू झालाय.

 

थोडक्यात बातम्या- 

“भाजपचे नेते रेमेडेसिविर इंजेक्शन विकत घेऊन सरकारला देणार होते, हे सपशेल खोटं”

बाप, भाऊ, जावयानं मिळून केली तरुणीची हत्या; यवतमाळमधील घटनेनं महाराष्ट्र हादरला

‘मानवतेचा इतका पुळका असेल तर…’; सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेचा जो बायडन यांच्यावर हल्लाबोल

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता चिमुरड्याचा जीव वाचवणाऱ्या मयुर शेळकेला उद्धव ठाकरेंचा फोन, म्हणाले…

‘हा मुंबई महापालिकेला बदनाम करण्याचा डाव’; ‘त्या’ वादग्रस्त व्हिडीओवर मुंबई महापालिकेचं स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More