बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आमच्यावर विश्वास ठेवा, कोरोना धोरण आखण्यात न्यायालयाच्या हस्तक्षेपाची गरज नाही- केंद्र सरकार  

नवी दिल्ली | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाल्यानंतर सरकारी यंत्रणांना धारेवर धरून कामाला लावणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाबद्दल केंद्र सरकारनं नापसंती दर्शविली आहे. आमच्यावर विश्वास ठेवा, कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारनं आखलेल्या धोरणात न्यायालयाच्या हस्तक्षेपाची गरज नाही, असं केंद्र सरकारनं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

देशातील कोरोना परिस्थितीच्या गैरव्यवस्थापनाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर रविवारी सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं केंद्र सरकारला कोरोना लसीकरणाच्या धोरणाबाबत पुनर्विचार करण्याबाबत सुचविले. तेव्हा केंद्र सरकारनं त्याला नकार देत सध्याचे लसीकरण धोरण परिपूर्ण असल्याचा दावा केला आहे.

कोरोनासारख्या गंभीर संकटाचा सामना करत असताना सरकारनं आखलेल्या धोरणात माननीय न्यायालयानं हस्तक्षेप करण्याची गरज नाही. व्यापक जनहिताचा विचार करता या धोरणात प्रशासनाला मोकळीक देण्यात आली आहे. कोरोना लसींचा मर्यादित साठा असताना हे धोरण सर्वांना समन्यायी पद्धतीनं वाटप करणारं आहे. मुळात कोरोनाची समस्या ही अचानक उद्भवल्यानं संपूर्ण देशातील नागरिकांना लस देणे शक्य नाही. त्यामुळे केंद्र सरकारनं कोरोना लसीकरणासाठी सर्व बाबींचा विचार करुन कोणावरही अन्याय होणार नाही आणि लसींचे समन्यायी पद्धतीनं वाटप होईल, अशा पद्धतीनं हे धोरण आखलं आहे. त्यासाठी राज्य सरकार, तज्ज्ञ आणि लस उत्पादकांशी चर्चा करण्यात आली आहे, असं केंद्र सरकारनं आपल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, राज्यांमध्ये ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांच्या वाटपासाठी सर्वोच्च न्यायालयानं 12 सदस्यीय राष्ट्रीय टास्क फोर्सची स्थापना केली होती. देशातील ऑक्सिजन उपलब्धता आणि पुरवठ्याचं मूल्यांकन आणि वितरण यासंदर्भात शिफारस करण्याचं काम टास्क फोर्सकडे सोपवण्यात आलं होतं. ही मोदी सरकारसाठी मोठी चपराक असल्याचं मानलं जातं.

थोडक्यात बातम्या

‘ग्रामीण भागात लस मिळेना’; शशिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

बुधवार पेठेत महिलेची हत्या केलेल्या आरोपीला अटक, ‘असा’ होता कट

लूडो गेम खेळण्याच्या बहाण्याने 55 वर्षीय नराधमाने 2 अल्पवयीन मुलींसोबत केलं ‘हे’ दुष्कृत्य

अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ; चांदिवाल समितीला दिवाणी अधिकार

‘या’ जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या साडेसात हजारांवरून थेट 3 हजारांवर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More