Top News पुणे महाराष्ट्र

राजकारणातील बादशहाला भेटायला बॉलिवूडचा शहेनशहा बारामतीत?

पुणे | बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता अजय देवगण यांचं शुक्रवारी (ता.१२) सकाळी अचानक बारामती विमानतळावर आगमन झालं. ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटण्यासाठी आल्याची चर्चा त्यामुळे परिसरात सुरु होती, मात्र ते आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी बारामतीत आले होते.

अजय देवगण सध्या आपल्या आगामी ‘मेडे’ या सिनेमाचं चित्रीकरण करत आहे. तो स्वतः या सिनेमात वैमानिकाच्या भूमिकेत आहे. अमिताभही या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. आकाशातून काही तर विमानतळावर काही दृश्यं चित्रीत करण्यासाठी त्यांनी बारामती विमानतळाची निवड केली होती.

दरम्यान, सकाळच्या सुमारास अमिताभ बच्चन तसेच अजय देवगण यांचं खासगी विमानानं बारामती विमानतळावर आगमन झालं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, बारामतीच्या नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे तसेच राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले, त्यानंतर अमिताभ यांनी आपला वेळ शुटिंगसाठी दिला.

दरम्यान, बारामती विमानतळ शहरापासून लांब असल्याने तिथे वर्दळ नसते, त्याने व्यत्यय येत नाही, या कारणामुळे या ठिकाणाची शुटिंगसाठी निवड करण्यात आली होती. अमिताभ बच्चन शुटिंग करुन परतल्यानंतर बारामतीत ते येऊन गेल्याची बातमी पसरली. काही ठिकाणी तर ते शरद पवार यांना भेटायला आल्याचीच कुजबूजही सुरु होती, मात्र त्यात काही तथ्य नव्हते.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक अपघात, …अन् कार थेट विहिरीत कोसळली!

‘पोलिसांनी पूजा चव्हाणची ती गोष्ट तपासावी, बऱ्याच गोष्टी बाहेर येतील’; भाजपच्या नेत्याच्या गौप्यस्फोट

…ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसाठी लाजिरवाणी गोष्ट- चंद्रकांत पाटील

पुन्हा लॉकडाऊनबाबत राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी तृप्ती देसाई आक्रमक, सरकारवर केला ‘हा’ गंभीर आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या