बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

किती गोड! अस्वलाच्या पिल्लाला बर्फ पकडताना पाहून नेटकरी म्हणाले सगळा ताण विसरलो, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | इंटरनेटवर प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. लोक देखील प्राण्यांचे व्हिडीओ आवर्जुन पाहतात. अशातच सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या असून काहींनी तर हा व्हिडीओ पाहून सगळा ताण-तणाव गेल्याचं कमेंटमध्ये म्हटलं आहे.

या व्हिडीओमध्ये अस्वल आणि तिचं पिल्लाने मानवी वस्तीत शिरकाव केल्याचं दिसतंय. यादरम्यान, हिमवर्षाव होत असल्याने अस्वलाचं पिल्लू बर्फाला पकडण्याचा प्रयत्न करतो. यासाठी ते पिल्लू अनेक वेळा छोट्या-छोट्या उड्या देखील मारतं. व्हिडीओ सीसीटिव्हीमध्ये कैद झाला असून ट्विटरवरील ‘Buitengebieden’ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

व्हिडीओ कुठला आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. या व्हिडीओमध्ये अस्वलाचं पिल्लू बर्फाचे बारिक-बारिक कण पकडण्याचा प्रयत्न करतोय. ते पाहून कोणाचाही ताण जाईल.

दरम्यान, सोशल मीडियावर सतत कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. मात्र प्राण्यांच्या व्हिडीओला सोशल मीडियावर विशेष पसंती मिळते. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत अस्वलाचं पिल्लू प्रचंड गोड असून आपण त्याच्या प्रेमात पडलो असल्याचं म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

बाबो! ‘फेअर अँड लव्हली’ची जाहिरात करणाऱ्या यामी गौतमला आहे ‘हा’ गंभीर त्वचा रोग!

‘तो जेव्हा गुप्त ऑपरेशनवर असतो…’; आर्यन खानवर केलेल्या कारवाईवर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकरची प्रतिक्रिया!

मोठी बातमी! 36 तासांच्या नजरकैदेनंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींना अटक

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाला धुळ चारत बच्चू कडूंची जिल्हा बँकेत बाजी

“जो अख्ख जहाज खरेदी करु शकतो त्याला ड्रग्ज विकायची काय गरज?”

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More