धरणाचे पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

नाशिक| अनेर धरणाच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या मांजरोद येथील शेतकऱ्यांनी सोमवारी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.

अनेर धरणाच्या 10 नंबरच्या पोटचारीतून मांजरोद येथील शेतकऱ्यांना पाणी दिले जात होते. या पोटचारीचे पाणी पाटबांधारे विभागाने अडवले आहे.

पाटबांधारे विभागाने पाणी अडवल्यामुळे 24 शेतकरी धरणाच्या पाण्यापासून वंचित झाले आहेत. पोटचारीतून पाणी सो़डावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्या हातातून रॉकेलच्या बाटल्या काढून घेत शेतकऱ्यांना रोखलं.

महत्वाच्या बातम्या

-धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करा; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

-योगी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं; पत्रकार प्रशांत कनोजिया यांची सुटका करण्याचे आदेश

विधानसभेला राज्यात महायुतीच्या ‘इतक्या’ जागा निवडून आणण्याचा सुधीर मुनगंटीवारांचा निर्धार

-दहावीच्या परिक्षेत साताऱ्याच्या जुळ्या भावांना जुळीच टक्केवारी

-…नाहीतर मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढणार- राजू शेट्टी