बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

यशोमती ठाकूर आणि रवी राणा यांच्यात तू-तू-मै-मै, सभागृहाचं वातावरण तापलं; पाहा व्हिडीओ

अमरावती | आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकारण चांगलंच तापताना दिसत आहे. अशातच अमरावती जिल्हा नियोजनाच्या आढावा बैठकीत दोन नेत्यांमध्ये चांगलीच तू-तू-मै-मै झाल्याचं पहायला मिळालं. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि आमदार रवी राणा यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचं पहायला मिळालं. दिवाळीच्या आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी विरोधक करत होते. त्यावेळी सभागृहाचं वातावरण चांगलंच तापलं होतं.

बैठकीदरम्यान रवी राणा यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना त्यांचा मुद्दा मांडता आला नाही. त्यावेळी त्यांनी उभा राहून आमचा मुद्दा मांडत बोलून देत नसल्याचा आरोप केला. त्यावर यशोमती ठाकूर आणि रवी राणा यांच्या तू-तू-मै-मै झाल्याचं पहायला मिळालं. आवाज कमी ठेवा, बोट दाखवायचं नाही असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी संताप व्यक्त केला आहे.

कोणाला काही बोलायचं आहे का कोणाला? असा सवाल यशोमती ठाकूर यांनी केला होता. त्यावर रवी राणा यांनी बोट दाखवत मी बसलोय इथं, माझं तरी ऐका, मी आमदार आहे, असं रवी राणा म्हणाले. त्यावर, व्यवस्थित बोला, आवाज कमी ठेवा, बोट दाखवायचं नाही, असंही यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत. त्यानंतर रवी राणा यांना खाली बसण्यास यशोमती ठाकूर यांनी सांगितलं.

तुमची दादागिरी या ठिकाणी चालणार नाही, असं रवी राणा यांनी म्हटलं. मी सदस्य आहे इथला मी बोलणारच, असं प्रत्युत्तर रवी राणा यांनी दिलं. त्यानंतर सभागृहाचं वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर बोलताना रवी राणा यांनी बोलताना महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

दोन वर्षात शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना काय मिळालं? निलेश राणेंची शरद पवारांवर जळजळीत टिका

‘तुम्ही पेट्रोल मला द्या ना…’, पेट्रोलपंपावर गायलेल्या गाण्याचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

‘या’ वर्षीही भेटणार वाहतूक करात सवलत?; ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

विमानाचा रंग पांढराच का असतो?, ‘हे’ आहे त्यामागचं विशेष कारण

पुणेकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ दिवशी राहणार पाणीपुरवठा पुर्णपणे बंद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More