तुकाराम मुंढेंना धक्का, दोन महिन्यातच पुन्हा बदली
मुबंई | आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे (IAS officer Tukaram Mundhe) हे नेहमीच त्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या झालेल्या बदल्या या त्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे झालं असल्याचं सांगितलं जातं. अशातच तुकाराम मुंढे आता पुुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
तुकाराम मुंढे यांना सरकारी सेवेत (In Government Service) येऊन 16 वर्षे झाली आहेत. या 16 वर्षात त्यांच्या 19 वेळा बदल्या झाल्या आहेत. आता देखील त्यांची अगदी दोनच महिन्यात पुन्हा एकदा बदली झाली आहे. त्यामुळे तो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
ते दोन महिन्यापुर्वी आरोग्य विभागात रुजू झाले होते. ते आरोग्य विभागाच्या आयुक्तपदाची (Commissioner) जबाबदारी सांभाळत होते. या विभागात रुजू झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली होती.
त्यांच्या या कारवाईमुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या होत्या. आरोग्य विभागातील कर्मेचारी आणि अधिकाऱ्यांचे त्यांनी कान टोचले होते. त्यामुळे काही अधिकाऱ्यांनी त्यांच्याबद्दल आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे तक्रार(complaint) केली होती.
तसेच आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) देखील त्यांच्यावर नाराज असल्याचं म्हणलं जात होतं. त्यामुळेच आता तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा आदेश समोर आला आहे. मात्र सध्या त्यांची नियुक्ती कोणत्या पदावर करण्यात येणार आहे किंवा आली आहे हे अजून स्पष्ट झालं नाही.
तुकाराम मुंढे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आला आहे. त्यांच्यासह इतर सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंढे यांच्यावर राष्ट्रीय आरोग्य अभियानाची (National Health Mission) देखील जबाबदारी देण्यात आली होती. मात्र अवघ्या दोनचं महिन्यात मुंढेची बदली झाल्याने चर्चेंना उत आला आहे.
महत्तवाच्या बातम्या
Comments are closed.