तुकाराम मुंढेंचा अधिकाऱ्यांना दणका; 7 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई

नाशिक | आपल्या तडफदार कामासाठी प्रसिद्ध असणारे नाशिक महापालिकेचे आयुक्त यांनी पालिकेतील काही अधिकाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. कामातील अनियमिततेमुळे अतिरिक्त आयुक्तांसह सात वरिष्ठ आधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश मुंढेंनी दिले आहेत. 

गंगापूर रोडवरील ग्रीन फिल्ड प्रकरणासह इतर प्रकरणांवरून या अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सातही अधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या प्रकरणात अनियमिततेबाबत दोषारोप निश्चित केले आहे. 

विभागिय चौकशी करण्याचा प्रस्ताव तयार केला असून महासभेच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. 

दरम्यान, अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे बाहेरील परसेवेतील अधिकारी असल्याने त्यांची चौकशीचा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे. 

कोण कोण आहेत ही अधिकारी?

अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे

अतिरिक्त निर्मुलन विभागाचे उपायुक्त आर. एम. बहिरम

नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण

माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी

मादी शहर अभियंता यू. बी. पवार

माजी अग्निशमन अधिकारी अनिल महाजन

लेखाधिकारी घोळप 

महत्त्वाच्या बातम्या-

-…म्हणून पुढील 48 तास जगभरातील सर्वांचं इंटरनेट बंद राहण्याची शक्यता!

-मुंबई सेंट्रल टर्मिनसला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं; आठवलेंची मागणी

भाजप सत्तेत आल्यास 3 महिन्यात राज्य लोडशेडिंगमुक्त करु, आश्वासनाचं काय झालं?

-#MeToo | मराठीत Black Rose चळवळ

-सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं; संघाचा मोदींवर अप्रत्यक्ष हल्ला

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या