बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर २५ हजार रुपये दंड आकारु; रस्त्यावर उतरुन तुकाराम मुंडेंची नियम तोडणारांना ताकीद

नागपूर | नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी धडक कारवाई केली. सेंट्रल एव्हेन्यू, मस्कासाथ, इतवारी, चितार ओळ या भागाचा आकस्मिक दौरा केला. अनेक ठिकाणी दुकानाचे सामान फुटपाथवर ठेवलेले त्यांना आढळले. आयुक्तांच्या निर्देशवरून अतिक्रमणविरोधी पथकाने असे संपूर्ण सामान जप्त केले.

 

 

त्यानंतर काही दुकानात स्वतः शिरून पाहणी केली. पाच पेक्षा अधिक ग्राहक असलेल्या दुकानांवर दंडात्मक कारवाई केली.

 

 

चितार ओळ येथील मूर्तीकारांनीही तयार केलेल्या मूर्ती रस्त्यावर ठेवल्या होत्या. त्यांना समज देऊन दंडात्मक कारवाई केली.

 

 

आजच्या पाच आणि दहा हजारांचा दंड नियम तोडणाऱ्यांवर ठोठावला. या कारवाईनंतरही दुकानदार ऐकत नसेल तर दंडाची रक्कम २५ हजारांपर्यंत करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

वडिलांचं ‘हे’ वाक्य जिव्हारी लागलं, म्हणून 15 वर्षीय तरूणीनं घेतला गळफास

मेडिकलचं शिक्षण घेत असलेल्या मुलीचा प्रताप! स्वतःच्या घरात प्रियकरासोबत केलं हे धक्कादायक कृत्य

कुलर ठरला जीवघेणा; तीन लहानग्या बहिणींनी जाग्यावरच सोडला जीव!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More