बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अभिमानास्पद! युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत ‘या’ 2 भारतीय वास्तूंची निवड

नवी दिल्ली | पुरातन मंदिरासाठी भारत हा देश मोठ्या प्रमाणात ओळखला जातो. एवढंच काय तर प्रत्येक ऐतिहासिक मंदिरामागे दडलेला इतिहास देखील लोकांना जास्त उत्साही बनवतो. अशातच आता युनेस्कोच्या वर्ल्ड हेरीटेजच्या यादीत भारतातील 2 वास्तूंची निवड करण्यात आली आहे. यावरुन नागपूरचे माजी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे.

युनेस्कोच्या यादीत तेलंगणामधील रामप्पा मंदीर आर्थातच काकतीय रुद्रेश्वर मंदीर आणि गुजरातमधील हडप्पा संस्कृतीचे धोलावीरा मंदीर या दोन वास्तूंची निवड झाली आहे. सरकारने 2019च्या युनेस्कोच्या यादीत स्थान मिळवण्यासाठी तेलंगणामधील रामप्पा मंदीरचे नाव दिले होते. त्यानंतर 25 जुलैच्या बैठकीत रामप्पा मंदिराला दर्जा देण्यात आला.

युनेस्कोच्या यादीत दोन भारतीय वास्तूंची निवड झाल्याबाबत अभिनंदन, युनेस्कोच्या यादीत दोन वास्तूंचा समावेश झाल्यामुळे युनेस्कोच्या यादीत एकूण 40 भारतीय ऐतिहासिक वास्तूंचा समावेश झाला आहे, असं ट्विट तुकाराम मुंढेंनी केलं आहे. 27 जुलै रोजी झालेल्या बैठकीमध्ये गुजरातमधील धोलावीरा या ठिकाणाला स्थान देण्यात आलं आहे.

दरम्यान, युनेस्कोच्या यादीत भारतातील 4 वास्तूंचं नाव देण्यात आलं होतं. यामध्ये अजिंठा आणि वेरुळच्या लेण्या, एलिफंटा लेणी आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स या स्थानांचा समावेश आहे.

पाहा ट्विट

थोडक्यात बातम्या-

पोस्टाची बंपर योजना; सेव्हिंग अकाऊंटवर मिळतंय बँकांपेक्षा जास्त व्याज

येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर समर्थकाची आत्महत्या; शातंता राखण्याचं आवाहन

ममता बॅनर्जींनी घेतली मोदींची भेट; ममतांच्या ‘या’ मागणीवर मोदी म्हणाले ‘मी बघतो’

काळीज पिळवटून टाकणारा अपघात; रस्त्याच्या कडेला बसलेल्या 18 कामगारांचा मृत्यू

कोविशिल्ड लस घेतलेल्यांसाठी आनंदाची बातमी; सशस्त्र सेना दलाच्या अभ्यासात ‘ही’ माहिती आली समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More