बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोकण, पश्चिम महाराष्ट्रामधील मृत्युतांडव, अश्रूतांडव शब्दापलीकडचं- तुकाराम मुंढे

मुंबई | महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे राज्यातील रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. दरड कोसळून कित्येक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अतिवृष्टीमुळे दरडी कोसळल्या त्यात 40पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यु झाला आहे. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी यावर बोलताना आपण निशब्द झाल्याचं म्हटलं आहे.

कोकणवासियांची घरे पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळलीत तर काहींच्या घरात पाणी शिरलं. या विदारक स्थितीवर बोलताना, महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील महाप्रकोपामध्ये मृत्युतांडव, अश्रूतांडव शब्दापलीकडचं आहे. निशब्द भावपूर्ण प्रार्थना, असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे.

महाडमधील दुर्घटनेमध्ये 50 लोकांनी आपला जीव गमावला आहे. यामध्ये कोणाची आईचं छत्र हरपलं आहे तर कोणाचा अख्ख घर संपलं आहे. या अस्मानी संकटामुळे कोकणवासियांना मोठी हानी झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भेट देत नागरिकांना धीर दिला आहे. मराठी अभिनेता भरत जाधवने सर्वांना एक आवाहन केलं आहे.

दरम्यान, आपल्याला कोकणाला मदतीचा हाता द्यायचा आहे. जास्त दिवस टिकतील असे सुके पदार्थ त्यासोबत वस्त्रे यासोबतच जमेल ती मदत करा, असं आवाहन भरत जाधवने सोशल माध्यमांवरून केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट; सक्रिय रुग्णांसह नवी रुग्ण संख्या आटोक्यात

काय सांगता! अवघ्या 23व्या वर्षी ‘ही’ महिला आहे 11 मुलांची आई, 105 मुलांची अपेक्षा

शाब्बास पुणेकरांनो! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

इलेक्ट्रिक कार घेणाऱ्यांना दीड लाखाची सूट, राज्याचं इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर

तुम्ही स्वतःला सावरा, बाकीची काळजी आम्ही घेऊ- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More