नागपूर | नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नागपुरमधील कुख्यात गुंड संतोष आंबेकर यांच्या घरावर हातोडा चालवला आहे. आंबेकर यांची शहरात मोठी दहशत आहे. त्यामुळे कारवाईच्या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
तुकाराम मुंडे यांनी संतोष आंबेकर याचा अनधिकृत बंगला पाडण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नागपुर महापालिकेच्या अतिकृमण विरोधी पथकाने आंबेकरचा बंगला पाडला. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.
आंबेकरने तीन प्लाॅट जोडून बंगला बांधला होता. त्याचा एक प्लॉट नेहा संतोष आंबेकर, दुसरा बंगला अमरचंद मदनलाल मेहता आणि तिसरा प्लाॅट स्वत: आंबेकरच्या नावावर होता. तिन्ही प्लॉटवर 803 चौरस मीटरचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते.
दरम्यान, डॅशिग प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडे आपल्या धडक कारवाईसाठी प्रसिद्ध आहेत. तसेच कर्तव्य पार पाडत असताना त्यांची शिस्त नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
राज्यातील 305 शाळा बंद करण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय
शिवस्मारकाच्या कामामध्ये गैरव्यवहार?; महाविकास आघाडीकडून मोठा खुलासा
महत्वाच्या बातम्या-
दिल्लीतील हिंसाचारामुळे सीबीएसईच्या परीक्षा पुढे ढकलल्या
सावरकरांचं योगदान विसरुन चालणार नाही- अजित पवार
बांगड्या घालण्याच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना जोरदार प्रत्युतर
Comments are closed.