Top News देश

शेतकरी आंदोलनाचा गैरफायदा घेण्याच्या प्रयत्नात ‘तुकडे-तुकडे गॅंग’-रविशंकर प्रसाद

पटणा | दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे कृषी कायद्याविरोधात गेले 19 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचा गैरफायदा घेण्याच्या प्रयत्नात ‘तुकडे-तुकडे गॅंग’ असून त्यांच्यावर मोदी सरकारच्या वतीने अत्यंत कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा केंद्रीय कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिला.

नव्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ भारतीय जनता पक्षाने सुरू केलेल्या, अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात प्रसाद बोलत होते.

देशाचे तुकडे करू पाहणाऱ्यांनी दिल्ली आणि महाराष्ट्रातील दंगली घडविण्यात सहभागी असलेल्या तथाकथित बुद्धिवाद्यांच्या सुटकेची मागणी केली आहे. परंतू पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले असून, त्यांना न्यायालय जामीन देत नाहीये. आता हे समाजकंटक शेतकरी आंदोलनाच्या आडून आपल्या मागण्या रेटत असल्याचा आरोप प्रसाद यांनी केला.

दरम्यान, जोपर्यंत सरकार नविन केलेले तीन कृषी कायदे रद्द करत नाही. तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी सरकारला दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘ठाकरे सरकारचा सत्यनाश झाला पाहिजे’; निलेश राणेंची जहरी टीका

हिवाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट, ‘इतक्या’ जणांना झाली कोरोनाची लागण

आज पासून विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात, आज ठाकरे सरकार 6 अध्यादेश आणणार

रतन टाटांच्या बायोपिकमध्ये आर माधवन करणार काम?; माधवन म्हणाला…

“भाजप नेत्यांचं हे वर्ष सरकार कधी पडतंय याचा मुहूर्त शोधण्यातच गेलं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या