तुळापूरला होणारा छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक सोहळा रद्द

पुणे | शिवपूत्र शंभुराजे राज्याभिषेक ट्रस्टच्या वतीने आयोजित छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा रद्द करण्यात आलाय. 16 जानेवारी रोजी हा कार्यक्रम पार पडणार होता.

1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे दंगल उसळली होती. त्यापार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून यंदाचा सोहळा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

शिवपूत्र शंभुराजे राज्याभिषेक ट्रस्टने यासंदर्भात निवेदन काढून माहिती दिलीय. महाराष्ट्रातून येणाऱ्या शंभुप्रेमींनी सहकार्य करावं, असं आवाहनही करण्यात आलंय.