Top News औरंगाबाद महाराष्ट्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर 31 मार्चपर्यंत बंद राहणार; मंदिर प्रशासनाचा निर्णय

Loading...

उस्मानाबाद |  महाराष्ट्रात प्रत्येक दिवसागणिक कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.

मंदिरातले सगळे विधीही पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तूर्तास तरी 31 मार्चपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र कोरोनाची प्रादुर्भाव जर वाढला तर पुढील निर्णय घेण्यात येईल, असंही मंदिर प्रशासनाने सांगितलं आहे.

Loading...

दुसरीकडे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 37 वर जाऊन पोहचली आहे. आज सकाळी मुंबईत 3 तर नवी मुंबईत 1 कोरोना रूग्ण आढळला असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

दरम्यान, तुळजा भवानी मंदिर ज्या मराठवाड्यातून येतं त्या मराठवाड्यात देखील कोरोनाने शिरकाव केला आहे. औरंगाबादेतील एका शिक्षिकेस कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिक चांगलेच धास्तावलेले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

जयंती मल्हारराव होळकरांची, फोटो वापरला तुकोजीरावांचा; राम शिंदेंकडून मोठी चूक

“…तस आदित्य ठाकरेंना खुश करण्यामध्ये अजित पवारांसह सर्वांचं भलं”

महत्वाच्या बातम्या-

सावधान! मुंबईत आणखी 4 जणांना कोरोनाची लागण

बुॉद्धिबळाचा राजा विश्वनाथन आनंद कोरोनामुळं जर्मनीत अडकला

“अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद स्टॅम्प पेपरवर लिहून द्या तरच चर्चेला या”

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या