जम्मू | जम्मू-काश्मीरमधील हीरानगर सेक्टरमधील पानसर येथे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी एक बोगदा शोधून काढला आहे. या बोगद्याची लांबी 150 मीटर आहे.
दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी पाकिस्तानी गुप्तचर विभागाकडून या बोगद्याची निर्मिती करण्यात आल्याचं कळतंय. दहा दिवसांच्या आत सीमेवर आढळलेला हा दुसरा बोगदा आहे.
बीएसएफने जून 2020 मध्ये याच भागात शस्त्र आणि स्फोटकं घेऊन जाणारे एक पाकिस्तानी हेक्साकॉप्टरला पाडलं होतं. जवानांनी नोव्हेंबर 2019 मध्ये याच क्षेत्रातील घुसखोरीचा प्रयत्न देखील हाणून पाडला होता.
लष्करी अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे की, आतापर्यंत जम्मू परिसरात दहाव्यांदा आणि मागील सहा महिन्यांमध्ये चौथ्यांदा बोगदा आढळून आला आहे.
थोडक्यात बातम्या-
लालू प्रसाद यादव दिल्लीच्या एम्स रूग्णालयात दाखल!
पुण्यात आगींचं सत्र सुरुच; रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील कचरा डेपोला भीषण आग
माझ्या वडिलांना हवा तो सन्मान मिळाला नाही- अनिता बोस
लग्नासाठी जाणाऱ्या कारचा टायर फुटून भीषण अपघात!
ममता बॅनर्जी यांनी मोदींच्यासमोरच ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणाऱ्यांना झापलं