२२ लाखाची तूर ताब्यात, मार्केटयार्ड आणि व्यापाऱ्यांचं साटंलोटं?

अहमदनगर | व्यापाऱ्यांचे तुरीने भरलेले २ ट्रक स्थानिक गुन्हेअन्वेषण विभागानं ताब्यात घेतलेत. यामध्ये तब्बल २२ लाख रुपये किंमतीची तूर असून पाथर्डी मार्केटयार्डच्या संगनमतानं ती सरकारदरबारी विकण्याचा डाव असल्याचं समोर येतंय.

व्यापाऱ्यांनी अवघ्या दीड ते २ हजार रु. दरानं ही तूर खरेदी केली होती. सरकारी बारदान्यात भरुन ती भोसरीला वखार महामंडळाच्या गोडाऊन पाठवली जात होती. या तूर रॅकेटमध्ये मार्केटयार्ड आणि व्यापाऱ्यांच्या हात असल्याचा आरोप ट्रक मालकानं केलाय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या