Top News विदेश

व्हॉट्सअपला मोठा झटका; ‘या’ देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली | जगातील सर्वात मोठं मेसेंजर असलेल्या व्हॉट्सअपने नुकताच आपल्या प्रायवसी पॉलिसीमध्ये मोठा बदल केला आहे. व्हॉट्सअप यापुढे वापरायचं असेल तर या बदलाला तुम्हाला सहमती द्यावी लागणार आहे.

फेसबुकने व्हॉट्सअप विकत घेतल्यानंतर त्यात मोठे बदल केले आहेत.  मात्र याचा फटका व्हॉट्सअपला बसला आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचप तैयप एर्दोगन यांच्या प्रसारमाध्यमांसंदर्भातील विभागाने राष्ट्राध्यक्ष इन्स्टंट मेसेजिंग अॅप असणाऱ्या व्हॉट्सअॅपचा प्लॅटफॉर्म सोडत असल्याचं सांगितलं आहे.

तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयानेही यापुढे आपण व्हॉट्सअॅपचा वापर करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यासोबतच ब्लूमबर्गने दिलेल्या एका रिपोर्टनुसार राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांनी 11 जानेवारी रोजी आपले व्हॉट्सअप गूप इनस्क्रिप्टेड मेसेजिंग अॅप असणाऱ्या बिप वर ट्रान्सफर करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, बीप हे तुर्कीमधील एक इनस्क्रिप्टेड अॅप आहे. राष्ट्राध्यक्षांनी आपण व्हॉट्सअप बंद करत असल्याची घोषणा केल्यामुळे नागरिकांनीही व्हॉट्सअप बंद करून  बीप वारण्याचा निर्णय घेतला आहे.

थोडक्यात बातम्या-

“मराठा आरक्षणासाठी नव्हे तर सातव प्रदेशाध्यक्ष होऊ नयेत म्हणून अशोक चव्हाण दिल्लीत

मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ?; किरीट सोमय्यांकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

तीन दिवसात दोनदा घसरले सोन्याचे भाव; आज काय आहे किंमत???

‘शेतकरी आंदोलन फसवे, आता हे नाटक बंद झाले पाहिजे’; भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

सरकारनं सुरक्षा काढली; मनसेनं स्थापन केलं स्वतःचं सुरक्षा पथक!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या